चेन्नई Cricket World Cup 2023 : विश्वचषकाचा पाचवा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळला जातोय. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनं आपल्या नावे एक मोठा विक्रम केला.
विश्वचषकात सर्वात जलद १००० धावा करणारा फलंदाज : डेव्हिड वॉर्नर विश्वचषकात सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाज बनला आहे. डावाच्या सातव्या षटकात हार्दिक पांड्याला स्ट्रेट ड्राईव्हद्वारे चौकार मारून त्यानं हा विक्रम आपल्या नावे केला. डेव्हिड वॉर्नरनं एकदिवसीय विश्वचषकातील १९ डावात १००० धावा पूर्ण केल्या आहेत. अशाप्रकारे विश्वचषकाच्या इतिहासात तो सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला.
-
David Warner becomes the fastest to has completed 1000 runs in ODI World Cups.
— CricketMAN2 (@ImTanujSingh) October 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
- Warner created history...!!! pic.twitter.com/NPe33KD6A4
">David Warner becomes the fastest to has completed 1000 runs in ODI World Cups.
— CricketMAN2 (@ImTanujSingh) October 8, 2023
- Warner created history...!!! pic.twitter.com/NPe33KD6A4David Warner becomes the fastest to has completed 1000 runs in ODI World Cups.
— CricketMAN2 (@ImTanujSingh) October 8, 2023
- Warner created history...!!! pic.twitter.com/NPe33KD6A4
वॉर्नरनं सचिन आणि डिव्हिलियर्सला मागं टाकलं : डेव्हिड वॉर्नरनं महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्सला मागं टाकलं आहे. एकदिवसीय विश्वचषकात १००० धावा पूर्ण करण्यासाठी या दोघांनी २०-२० डाव घेतले होते. डेव्हिड वॉर्नरनं केवळ १९ डावांमध्ये हा टप्पा गाठला.
रोहितकडे वॉर्नरला मागे टाकण्याची संधी : एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जलद हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारतीय कर्णधार रोहित शर्माचाही समावेश आहे. आतापर्यंत त्यानं १७ डावात ९७८ धावा केल्या आहेत. आता रोहितकडे वॉर्नरला मागे टाकून एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाज बनण्याची संधी असेल. रोहितला वॉर्नरला मागे टाकण्यासाठी फक्त २२ धावांची गरज आहे.
विश्वचषकात सर्वात जलद १००० धावा करणारे टॉप ५ फलंदाज : एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सचिन तेंडुलकर आणि एबी डिव्हिलियर्स यांनी १००० धावा पूर्ण करण्यासाठी २० डाव घेतले. तर विव रिचर्ड्स आणि सौरव गांगुली यांनी २१-२१ डावांमध्ये १००० धावा पूर्ण केल्या. ऑस्ट्रेलियाच्या मार्क वॉनं १००० धावा करण्यासाठी २२ डाव घेतले.
-
David Warner is the fastest player to score 1000 ODI runs in ODI World Cups. 🔥 pic.twitter.com/PDDnvXYOH3
— CricTracker (@Cricketracker) October 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">David Warner is the fastest player to score 1000 ODI runs in ODI World Cups. 🔥 pic.twitter.com/PDDnvXYOH3
— CricTracker (@Cricketracker) October 8, 2023David Warner is the fastest player to score 1000 ODI runs in ODI World Cups. 🔥 pic.twitter.com/PDDnvXYOH3
— CricTracker (@Cricketracker) October 8, 2023
हेही वाचा :
- ICC ODI World Cup 2023 India Vs Australia : भारतीय फिरकीपटूंचा कहर, ऑस्ट्रेलियाचे ६ गडी बाद; वाचा स्कोर
- Cricket World Cup 2023 : भारतात आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव विश्वचषकासाठी उपयुक्त ठरेल - पॅट कमिन्स
- Cricket World Cup 2023 : वर्ल्ड कप २०२३ पूर्वी पाकिस्तानचे फक्त २ खेळाडू भारतात आले होते, जाणून घ्या त्यांची नावं