नॉटिंगहॅम - विश्वकरंडक स्पर्धेत आज दोन 'छुपे रुस्तम' एकमेकांशी भिडणार आहेत. या सामन्यामध्ये पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिजच्या संघाशी दोन हात करायला मैदानात उतरेल. दोन वर्षांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱया पाकिस्तानने आपले अखेरचे १० एकदिवसीय सामने गमावले आहेत. सराव सामन्यात पाकिस्तानला अफगाणिस्तानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. तर, वेस्ट इंडिजने न्यूझीलंडवर धमाकेदार विजय मिळावला होता. आजचा सामना ३ वाजता सुरू होईल.
कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटण्यची क्षमता विंडीजकडे आहे. विंडीजने टी -२० क्रिकेटचा विश्वचषक अनपेक्षितरित्या जिंकला होता. तर, दोन वर्षांपूर्वी पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी खिशात घातली होती.
सामन्यातील प्रमुख आकर्षण -
मोहम्मद आमिर
बंदीची शिक्षा भोगलेल्या मोहम्मद आमिरचा अंतिम क्षणी पाकिस्तानच्या संघात समावेश केला गेला. त्यामुळे आमिरच्या कामगिरीवर पाकिस्तानचा संघ अवलंबून आहे.
शाय होप
न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात शाय होपने शतक झळकाले होते. एविन लुइस, आंद्रे रसेल आणि जेसन होल्डर यांनी सराव सामन्यात चांगली फलंदाजी केली होती.
आंद्रे रसेल
यंदाच्या आयपीएलमध्ये रसेलने साऱ्यांनाच प्रभावित केले आहे. ३३ वर्षीय रसेलने ९ सामन्यात २१८ च्या स्ट्राइक रेटने ३९२ धावा कुटल्या आहेत.
पाकिस्तानचा संघ -
- सर्फराज अहमद (कर्णधार), बाबर आजम, फखर जमान, इमाम उल हक, हॅरिस सोहेल, आसिफ अली, मोहम्मद हफीज, इमाद वसीम, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद हसनैन, शादाब खान, शोएब मलिक आणि वहाब रियाज.
विंडीजचा संघ -
- जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, आंद्रे रसल, शेल्डन कॉटरेल, शॅनन गॅब्रिएल, केमार रोच, निकोलस पूरन, ऍशले नर्स, फॅबियन ऍलन, शिमरॉन हेटमायर, शाय होप, ओशन थॉमस, कार्लोस ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, इव्हिन लुईस.