ETV Bharat / sports

'हे' विक्रम ठरले युवराजच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट

युवराजने कर्करोगाशी यशस्वी लढा देत दिमाखात पुनरागमन केले होते

युवराजच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट
author img

By

Published : Jun 10, 2019, 5:48 PM IST

मुंबई - आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भारताचा डावखुरा स्फोटक फलंदाज युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. युवराजने आपल्या १९ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये अनेक वादळी खेळ्या केल्या आहेत. २०११ साली झालेल्या विश्वकरंडक विजयानंतर युवराजला कर्करोगाचे निदान झाले होते. युवराजने कर्करोगाशी यशस्वी लढा देत दिमाखात पुनरागमन केले होते. अशा या लढवय्या खेळाडूने अनेक विक्रम आपल्या नावे केले. या विक्रमांनीच युवराजला खरी ओळख मिळवून दिली.

सलग 6 षटकारांचा विक्रम -

युवराज सिंगने भारताला २००७ साली झालेला टी-ट्वेन्टी विश्वकरंडक आणि २०११ साली झालेला एकदिवसीय विश्वकरंडक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. २००७ साली त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात लगावलेले ६ षटकार आजही क्रिकेटप्रेमींच्या लक्षात आहेत.

विश्वकरंडक स्पर्धेत भारताकडून तीनवेळा मालिकावीर किताब पटकावणारा एकमेव खेळाडू -
युवराजला 1996 ला झालेल्या 15 वर्षांखालील विश्वकरंडकात मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता. तसेच 2007 चा आंतरराष्ट्रीय टी-20 वर्ल्डकप आणि 2011 च्या एकदिवसीय वर्ल्डकपमध्येही त्याला मालिकावीरचा पुरस्कार मिळाला आहे.

सर्वात जलद अर्धशतक -
युवराज सिंगने 2007 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळाताना 12 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. याच सामन्यात त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात ६ षटकार लगावले होते.

आयसीसी स्पर्धेचा सर्वाधित वेळा अंतिम सामना खेळणारा खेळाडू -
युवराज सिंग क्रिकेटमधील एकमेव असा खेळाडू आहे ज्याने आयसीसीच्या स्पर्धांमध्ये 7 वेळा अंतिम सामने खेळले आहेत. युवीने 2000, 2002 आणि 2017 ची चॅम्पियन ट्रॉफी, 2003 विश्वचषक, 2007 टी-20 विश्वचषक, 2011 एक दिवसीय विश्वचषक, 2014 टी-20 विश्वचषक या स्पर्धेचे अंतिम सामने खेळले आहेत.

Intro:Body:

Sport

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.