ETV Bharat / sports

विश्वकरंडकातील 'एक्झिट'नंतर बांगलादेशने दाखवला कोचला घरचा रस्ता! - Steve Rhodes

स्टीव्ह ऱ्होड्स यांची जून २०१८ मध्ये बांगलादेशच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली होती.

विश्वकरंडकातील 'एक्झिट' नंतर बांगलादेशने दाखवला कोचला घरचा रस्ता!
author img

By

Published : Jul 9, 2019, 10:23 AM IST

लंडन - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतून बाहेर पडलेल्या बांगलादेश संघाने एकमताने मुख्य प्रशिक्षक स्टीव्ह ऱ्होड्स यांची हकालपट्टी केली आहे. कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आतच ऱ्होड्स यांना मायदेशी परतावे लागणार आहे.

स्टीव्ह ऱ्होड्स यांची २०१८ च्या जूनमध्ये बांगलादेशच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली होती. दोन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली होती. पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत ऱ्होड्स ही जबाबदारी सांभाळणार होते. मात्र, बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि ऱ्होड्स यांनी एकमताने हा करार संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Steve Rhodes is no longer Bangladesh head coach after parting ways with the BCB by "mutual consent." ⬇️https://t.co/Jfy2EJbn3p

    — Cricket World Cup (@cricketworldcup) July 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजीचे प्रशिक्षक कोर्टनी वॉल्श आणि फिरकीचे प्रशिक्षक सुनील जोशी यांचा कार्यकाळ विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडताच संपुष्टात आला आहे. तर, संघाच्या फलंदाजीचे प्रशिक्षक नील मॅकेंझी सध्या सुट्टीवर गेले आहेत. यंदाच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशची कामगिरी चांगली झाली होती. जायंट किलर म्हणून ओळख असलेल्या या संघाने सर्वांना प्रभावित केले होते. मात्र, उपांत्य फेरी गाठण्यात त्यांना अपयश आले. बांगलादेश विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धे्च्या गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. त्यांनी ९ सामन्यामध्ये ३ विजय मिळवले आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.