लंडन - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेतून दक्षिण आफ्रिकेचा संघ बाहेर पडला आहे. पाकिस्तानने आफ्रिकेला ४९ धावांनी पराभूत केले. सामन्यात केलेल्या निराशाजनक कामगिरीवर आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसीसने धक्कादायक खुलासा केला आहे. आफ्रिकेचा सर्वोत्तम गोलंदाज कगिसो रबाडाची मंदावलेली कामगिरी ही आयपीएलची देण असल्याचे डु प्लेसीसने स्पष्ट केले आहे.
-
Faf du Plessis "we did try and get him (Kagiso Rabada) not to go to the IPL" #CWC19 pic.twitter.com/rUmbcDIfw2
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) June 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Faf du Plessis "we did try and get him (Kagiso Rabada) not to go to the IPL" #CWC19 pic.twitter.com/rUmbcDIfw2
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) June 23, 2019Faf du Plessis "we did try and get him (Kagiso Rabada) not to go to the IPL" #CWC19 pic.twitter.com/rUmbcDIfw2
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) June 23, 2019
डु प्लेसीस पुढे म्हणाला, ' रबाडा हा आमच्या संघातला सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. तो सातत्याने तीनही स्तरातून गोलंदाजी करतो आहे. त्याला विश्वचषकापूर्वी विश्रांतीची आवश्यकता होती. त्यामुळे आयपीएलमध्ये तो खेळू नये अशी आमची इच्छा होती. पण, तो आयपीएल खेळला. आणि त्याच्या संथ कामगिरीचा परिणाम विश्वचषकात दिसून आला. इम्रान ताहिरने उत्कृष्ट गोलंदाजी केली पण त्याला इतर गोलंदाजांची साथ लाभली नाही.'