बर्मिंगहॅम - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानविरुध्द न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने ६ बळी राखून विजय मिळवला. हॅरिस सोहेल आणि बाबर आझम या दोघांनी फलंदाजीत भागिदारी रचत पाकच्या विजयाचा मार्ग सुकर केला. या सामन्यात पाक कर्णधार सरफराज अहमदने यष्टीरक्षण करताना एक भन्नाट झेल घेतला.
सामन्याच्या तिसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवर शाहिन आफ्रिदीने रॉस टेलरला बाद केले. यावेळी बॅटची कड घेऊन चेंडू स्लिपच्या दिशेने जाऊ लागला. सरफराजने लगेच उडी मारत तो झेल टिपला. भारताविरुद्ध हरल्यानंतर सरफराजला ट्रोल करण्यात आले होते. एका चाहत्याने त्याला पोटल्या म्हणूनही हिणवले होते.
-
"What a catch! WHAT A CATCH! 🙌
— ICC (@ICC) June 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
"The skipper knows how important that is!"#SarfarazAhmed takes a superb diving catch and Pakistan's #CWC19 campaign is well and truly alive! #WeHaveWeWill pic.twitter.com/BzjxSVNp8w
">"What a catch! WHAT A CATCH! 🙌
— ICC (@ICC) June 26, 2019
"The skipper knows how important that is!"#SarfarazAhmed takes a superb diving catch and Pakistan's #CWC19 campaign is well and truly alive! #WeHaveWeWill pic.twitter.com/BzjxSVNp8w"What a catch! WHAT A CATCH! 🙌
— ICC (@ICC) June 26, 2019
"The skipper knows how important that is!"#SarfarazAhmed takes a superb diving catch and Pakistan's #CWC19 campaign is well and truly alive! #WeHaveWeWill pic.twitter.com/BzjxSVNp8w
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर विजयासाठी २३८ धावांचे आव्हान ठेवले होते. न्यूझीलंडकडून जेम्स नीशामने सर्वाधिक ९७ धावा केल्या. तर कॉलिन डी ग्रँडहोमने ६४ धावा करत त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी १८३ धावांची भागीदारी करत न्यूझीलंडची धावसंख्या दोनशेपार नेली.