नवी दिल्ली - भारताचा क्रिकेटर करुण नायर याने आपली प्रेमिका शनाया टाकरीवाला हिच्याशी साखरपुडा केला. २७ वर्षीय नायर याने सोशल मीडियावर प्रेमिका शनाया हिचा फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत ही माहिती दिली.
नायर हिची प्रेमिका शनाया हिनेही आपल्या इंस्ट्रागाम अकाउंटवर फोटो टाकत प्रेमाची कबुली दिली आहे. नायरने पोस्टसोबत शनाया हिने होकार दिला असल्याचेही लिहले आहे. २०१६ साली चेन्नईमध्ये इंग्लंड विरुध्दच्या कसोटी सामन्यात करुण नायरने त्रिशतक केले होते. त्यानंतर नायर प्रसिध्दीच्या झोतात आला होता.
टेस्ट क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावूनही नायर याला संघात आपले स्थान टिकवता आले नाही. तो मागील वर्षी इंडियन प्रीमीयर लीग किंग्ज इलेवन पंजाबकडून खेळला होता.