लीड्स - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची श्रीलंकेशी लढत होणार आहे. लंकेला पराभवाचा धक्का देऊन गुणतालिकेत अव्वल येण्याचे भारताचे लक्ष्य असणार आहे. लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर हा सामना दुपारी ३ वाजता चालू होईल.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताने २८ धावांनी विजय मिळवला होता. रोहित शर्माने दमदार अर्धशतक झळकावत विश्वचषक स्पर्धेतील आपला फॉर्म कायम राखला होता. दुसरीकडे स्पर्धेबाहेर पडलेल्या लंकेने शेवटच्या सामन्यात विंडीजचा २३ धावांनी पराभव केला होता. आता भारताला हरवून शेवट गोड करण्याचा त्यांचा निर्धार असेल.
दोन्ही संघ -
- भारत - विराट कोहली (कर्णधार) ऋषभ पंत, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मयांक अगरवाल, रवींद्र जडेजा.
- श्रीलंका - दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, थिसारा परेरा, कुशल परेरा, धनंजय डिसेल्वा, कुशल मेंडिस, आयसुरु उडाना, मिलींदा सिरिवर्धना, अविष्का फर्नांडो, जीवन मेंडिस, लाहिरु थिरिमन्ने, जेफ्री वंडरसे, नुवान प्रदीप, सुरांगा लकमल