ETV Bharat / sports

IND Vs PAK, T20 World Cup 2021 : भारत -पाकिस्तान म्हणजे क्रिकेटचे युद्धच ! आतापर्यंतचे विश्वचषकातील थरारक सामने

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानच्या मुकाबल्याचे सत्र 2007 पासून सुरू आहे. दरम्यानच्या काळात सामने बदलले, खेळाडू बदलले मात्र सामन्याचा परिणाम काही बदललेला नाही. भारतीय टीमने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. तर नजर टाकुया दोन्ही संघांदरम्यान होत असणाऱ्या सामन्यांवर व त्यातील निकालांवर

India Vs Pakistan World Cup
India Vs Pakistan World Cup
author img

By

Published : Oct 24, 2021, 6:59 PM IST

Updated : Oct 27, 2021, 7:02 AM IST

हैदराबाद -आज आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा केवळ भारत आणि पाकिस्तानसाठीच नाही, तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठीही खूप महत्त्वाची आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहते वाट पाहत आहेत. भारत - पाक क्रिकेट मुकाबला खेळाच्या इतिहासात सर्वात रोमांचक मुकाबल्यांपैकी एक असतो. भारत-पाकिस्तानमध्ये जगाच्या कोणत्याही देशात सामना असला तरी जगभरातील क्रिकेटचाहत्यांच्या नजरा या सामन्याकडे लागलेल्या असतात. भारत-पाक या पारंपारिक प्रतिद्वद्वी संघाचा इतिहास जवळपास सात दशक पुराना आहे. परंतु अजूनही दोन्ही संघामधील सामना रोमांचक होतो व क्रिकेटप्रेमींच्या ह्रदयाचे ठोके वाढले जातात.

भारत - पाक क्रिकेट इतिहासाची सुरुवात 1952 मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यापासून झाली. त्यानंतर हे दोन्ही देश वनडे व टी-20 सामन्यात अनेक वेळा आमने-सामने आले मात्र भारताने टेस्ट, वनडे आणि टी-20 या तिन्ही प्रकारात पाकिस्तानला मात दिली आहे.

भारत-पाक दरम्यान टेस्ट, वनडे आणि टी-20 सामने -

  • पहिला कसोटी सामना ऑक्टोबर 1952 मध्ये दिल्लीत खेळला गेला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये 59 टेस्ट मॅच खेळले गेले आहेत.
  • दोन्ही देशांमध्ये पहिला एकदिवसीय सामना ऑक्टोबर 1978 मध्ये क्वेटा येथे खेळला गेला. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये 132 वनडे सामने खेळविण्यात आले आहेत.
  • पहिला टी-20 सामना 14 सप्टेंबर 2007 रोजी दरबान येथे खेळला गेला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये टी-20 क्रिकेटचे आठ सामने झाले आहेत.
  • सीमेवर तनावाची स्थिती असल्याने दोन्ही देशांदरम्यान क्रिकेट सामने स्थगित झाले. शेवटचा कसोटी सामना 2007 मध्ये खेळला गेला होता.
  • भारत - पाकिस्तानमध्ये 59 कसोटी सामन्यांपैकी भारताने 9 तर पाकिस्तानने 12 टेस्ट सामने जिंकले आहेत. तर 38 सामने अनिर्णित राहिले आहेत.
  • भारत-पाकिस्तानमध्ये पहिला एकदिवसीय सामना 1 ऑक्टोबर 1978 रोजी क्वेटा येथे खेळविण्यात आला होता. हा सामना भारताने चार धावांनी जिंकला होता.
  • दोन्ही संघादरम्यान शेवटचा एकदिवसीय सामना जून 2019 मध्ये इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेत खेळवला गेला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला होता.

भारत vs पाकदरम्यान पहिला एकदिवसीय सामना -

भारत-पाकिस्तान संघामध्ये खेळल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने निर्धारित 40 षटकांत सात विकेट गमावून 170 धावा केल्या होत्या. या सामन्यात मोहिंदर अमरनाथने 51 धावा तर सुरिंदर अमरनाथ यांनी 37 व दिलीप वेंगसरकरने 34 धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानने माजिद खानच्या 50 धावांच्या बळावर 40 षटकात आठ विकेट गमावून 166 धावांपर्यंत मजल मारली होती. या सामन्यात भारताने चार धावांनी विजय मिळवला. भारताकडून मोहिंदर अमरनाथ व बिशन सिंह बेदी यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या. मोहिंदर अमरनाथ यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

भारत vs पाकिस्तान पहला टी-20 रेकॉर्ड -

भारत आणि पाकिस्तान दरम्यान पहिला टी-20 सामना 14 सप्टेंबर 2007 मध्ये साउथ अफ्रिकेतील दरबान शहरान खेळला गेला. पाकिस्तानने नाणेफक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याची निर्णय घेतला होता. प्रथम फलंदजी करताना भारतने रोहित शर्मा 50 आणि एमएस धोनीच्या 33 धावांच्या बळावर 20 षटकात 9 विकेट गमावून 141 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून मोहम्मद आसिफने चार विकेट घेतल्या होत्या. धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने मिस्बाह उल हक (53) च्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकात सात विकेट गमावून 141 धावा केल्या. सामना टाय झाल्याने याचा निर्णय बॉल आउट मध्ये झालाय यामध्ये भारताने पाकला 3-0 ने धूळ चारली.

भारत vs पाकिस्तान T-20 रेकॉर्ड -

भारत - पाकिस्तान संघामध्ये पहिला टी-20 सामना 14 सप्टेंबर 2007 मध्ये साउथ अफ्रिकेतील दरबान शहरान खेळला गेला. या सामन्यात बॉल आउटमध्ये पाकिस्तानला हरवले गेले. दोन्ही संघामध्ये शेवटचा टी-20 सामना मार्च 2016 मध्ये टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत कोलकाता येथे खेळला गेला. या सामान्यात भारताने पाकिस्तानचा सहा गडी राखून धुव्वा उडवला. भारत - पाकिस्तान दरम्यान खेळल्या गेलेल्या 8 टी-20 सामन्यात भारताने सहा वेळा पाकला धूळ चारली आहे. तर एकमेव सामना पाकिस्तानने जिंकला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे.

भारत-पाक आयसीसी टूर्नामेंट्स रेकॉर्ड -

भारतीय टीमने आयसीसी टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानविरुद्ध 17 सामन्यांपैकी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानने तीन सामने जिंकले आहेत. एक मॅच टाय झाली आहे. भारताने आतापर्यंत पाकिस्तानविरद्ध झालेल्या 50 षटकांच्या सात एकदिवसीय विश्वचषक सामन्यातही विजय मिळवला आहे.

भारत-पाकिस्तान दरम्यान टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांपैकी चार सामने जिंकले आहेत. तर 2007 मध्ये एक टी-20 वर्ल्ड कपमधील सामना चाय राहिला आहे. चँपियंस ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान संघामध्ये पाच सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी दोन भारताने तर तीन पाकिस्तानने जिंकले आहेत.

Last Updated : Oct 27, 2021, 7:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.