ETV Bharat / sports

'भारताच्या पराभवाला धोनी आणि शास्त्री जबाबदार', योगराज सिंग यांचा आरोप - india vs new zealand

ईटीव्ही भारतसोबत केलेल्या खास मुलाखतीमध्ये योगराज सिंग यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे.

'भारताच्या पराभवाला धोनी आणि शास्त्री जबाबदार', योगराज सिंग यांचा आरोप
author img

By

Published : Jul 13, 2019, 1:37 PM IST

नवी दिल्ली - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने १८ धावांनी पराभव केला. त्यामुळे भारताचे आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या जेतेपदाचे स्वप्न भंगले. या सामन्यातील पराभवाला युवराज सिंगचे वडिल योगराज सिंग यांनी महेंद्रसिंह धोनी आणि रवी शास्त्री यांना जबाबदार ठरवले आहे.

ईटीव्ही भारतसोबत केलेल्या खास मुलाखतीमध्ये योगराज सिंग यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. धोनीमुळे युवराजचे दोन वर्ल्डकप वाया गेल्याचेही त्यांनी म्हटले आहे. उपांत्य फेरीत झालेल्या पराभववाबद्दल त्यांना विचारण्यात आले असता, ते म्हणाले, 'ज्या पद्धतीने जडेजा खेळत होता तसे धोनी का खेळला नाही. कारण त्याला आऊट होण्याची भिती वाटत होती.'

योगराज सिंग

योगराज सिंग यांनी खेळाडूंच्या निवडीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. रवी शास्त्री आणि धोनी हे एकाच विचाराचे असून जे खेळाडू चांगले खेळतात त्यांना संघात सामिल करुन घेतले नाही, असेही योगराज यांनी म्हटले आहे.

या सामन्यात भारताच्या टॉप फलंदाजांनी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. तेव्हा महेंद्रसिंह धोनीने संघाची पडझड रोखली. त्याने जडेजासोबत आठव्या विकेटसाठी ११६ धावांची भागिदारी केली. धोनी आणि जडेजाच्या भागिदारीने भारत पुन्हा सामन्यात परतला. मात्र, धोनीचे प्रयत्न भारताला विजय मिळवून देऊ शकले नाहीत आणि शेवटी भारताचा पराभव झाला.

Intro:Body:

india lost to new zealand  because of shastri and dhoni says yograj singh

icc, cricket world cup, msd, dhoni, ravis shatri, india vs new zealand, semifinal

'भारताच्या पराभवाला धोनी आणि शास्त्री जबाबदार', योगराज सिंग यांचा आरोप

नवी दिल्ली - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने १८ धावांनी पराभव केला. त्यामुळे भारताचे आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेच्या जेतेपदाचे स्वप्न भंगले. या सामन्यातील पराभवाला युवीचे वडिल योगराज सिंग यांनी महेंद्रसिंह धोनी आणि रवी शास्त्री यांना जबाबदार ठरवले आहे.

ईटीव्ही भारतसोबत केलेल्या खास मुलाखतीमध्ये योगराज सिंग यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. धोनीमुळे युवराजचे दोन वर्ल्डकप वाया गेल्याचेही त्यांनी म्हटले आहे. उपांत्य फेरीत झालेल्या पराभववाबद्दल त्यांना विचारण्यात आले असता, ते म्हणाले, 'ज्या पद्धतीने जडेजा खेळत होता तसे धोनी का खेळला नाही. कारण त्याला आऊट होण्याची भिती वाटत होती.'

योगराज सिंग यांनी खेळाडूंच्या निवडीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. रवी शास्त्री आणि धोनी हे एकाच विचाराचे असून जे खेळाडू चांगले खेळतात त्यांना संघात सामिल करुन घेतले नाही. असेही योगराज यांनी म्हटले आहे.

या सामन्यात भारताच्या टॉप फलंदाजांनी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीसमोर गुडघे टेकले. तेव्हा महेंद्रसिंह धोनीने संघाची पडझड रोखली. त्याने जडेजासोबत सातव्या विकेटसाठी ११६ धावांची भागिदारी केली. धोनी आणि जडेजाच्या भागिदारीने भारत पुन्हा सामन्यात परतला. मात्र धोनीचे प्रयत्न भारताला विजय मिळवू शकले नाहीत. आणि शेवटी भारताचा पराभव झाला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.