ETV Bharat / sports

तुला भारताने न्याय दिला नाही...तू आमच्याकडून खेळ...आईसलँडचं 'या' खेळाडूला पत्र

आईसलँड क्रिकेट संघाने रायुडूला आपल्या संघाकडून खेळण्याची ऑफर दिली आहे.

author img

By

Published : Jul 3, 2019, 9:23 AM IST

Updated : Jul 3, 2019, 10:20 AM IST

आईसलँड क्रिकेट संघाने रायुडूला आपल्या संघाकडून खेळण्याची ऑफर दिली आहे.

नवी दिल्ली - यंदाची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा पाऊस आणि दुखापतींच्या विळख्यात सापडली आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडला. त्यानंतर विजय शंकरही स्पर्धेतून बाद झाला. शंकरच्या जागी मयंक अगरवालला अनपेक्षितरित्या संधी मिळाली. फलंदाज अंबाती रायडूचा विचार न केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या, पण रायडूला एक संघ खेळवण्यास कमालीचा उत्सूक आहे.

आईसलँड क्रिकेट संघाने रायुडूला आपल्या संघाकडून खेळण्याची ऑफर दिली आहे. शिवाय, आईसलँड देशाचे नागरिकत्व स्वीकारण्यासाठी कोणत्या कादगपत्रांची गरज लागते, याची माहितीही त्यांनी चक्क आपल्या ट्विटर अकाऊंटवर पाठवली आहे.

फलंदाज अंबाती रायडूचे थ्री-डी गॉगलचे ट्विट खूप गाजले होते. त्याचाच आधार घेत आईसलँड क्रिकेटने हे ट्विट केले आहे. सोबत, संघात निवड झालेल्या मयंक अगरवालच्या कामगिरीचाही उल्लेख या ट्विटमध्ये आईसलँडने केला आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 3, 2019, 10:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.