ETV Bharat / sports

धोनीला बलिदान बॅजचे चिन्ह वापरायला परवानगी नाहीच - आयसीसी

धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्ह कायम ठेवण्यासाठी बीसीसीआय प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी आयसीसीकडे परवानगी मागितली होती. परंतु, आयसीसीने याला नकार दिला आहे.

महेंद्रसिंह धोनी
author img

By

Published : Jun 7, 2019, 11:54 PM IST

दुबई - आयसीसी विश्वकरंडकात ५ जुलै रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने बलिदान बॅजचे चिन्ह असलेले ग्लोव्हज वापरले होते. यानंतर, आयसीसीच्या लक्षात ही बाब आल्यानंतर आयसीसीने बीसीसीआयल धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्ह हटवायला सांगितले होते.

प्रशासकीय समितीने मागितली होती परवानगी

धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्ह कायम ठेवण्यासाठी बीसीसीआय प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी आयसीसीकडे परवानगी मागितली होती. परंतु, आयसीसीने याला नकार दिला आहे. त्यामुळे, धोनीला पुढील सामन्यात बलिदान बॅजचे चिन्ह असलेले ग्लोव्हज घालून सामन्यात खेळता येणार नाही.

धोनीमुळे आयसीसीच्या 'या' नियमाचे होते उल्लंघन

आयसीसीच्या स्पर्धेत कोणत्याही प्रकारचा खासगी प्रचार प्रसार करण्यास परवानगी नाही. धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्ह या नियमाचे उल्लंघन करते. याबाबत मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत एका सदस्याने याबाबत परवानगी मागण्यासाठी सांगितले होते. यामुळे, आयसीसीने परवानगी दिल्यानंतर धोनीला चिन्ह वापरण्यास मिळेल.

dhonis sign
धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्ह

आयसीसीचे अधिकारी क्लेअर फर्लोंग यांनी याबाबत म्हटले होते, की बलिदान ब्रिगेड चिन्ह कोणत्याही राजकीय आणि धार्मिक बाबीशी निगडीत नसल्याचे बीसीसीआयने पटवून दिल्यास धोनीच्या ग्लोव्हजवरील चिन्ह कायम राखण्याच्या परवानगीवर विचार केला जावू शकतो. बलिदान बिग्रेडचे चिन्ह हे फक्त पॅरा मिलिटरी कमांडोच वापरू शकतात. आम्ही बीसीसीआयला हे चिन्ह हटवण्यासाठी सांगितले आहे.

icc rule
आयसीसीचा नियम

धोनीला लेफ्टनंट कर्नलची मानद उपाधी

२०११ साली धोनीला पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नलची मानद उपाधी मिळाली होती. २०१५ साली धोनीने पॅरा बिग्रेडचे प्रशिक्षणही घेतले आहे.

Intro:Body:

Ajay

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.