लॉर्ड्स - विश्वकरंडक स्पर्धा २०१९ च्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला. न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले.
LIVE UPDATE -
- इंग्लडचा विजय
- इंग्लडला विजयासाठी 6 चेंडूत 15 धावाची गरज
- जोप्रा आर्चर बाद
- लियाम प्लंकेट बाद, इंग्लडला 9 चेंडूत 22 धावांची गरज
- इंग्लडला विजयासाठी 12 चेंडूत 24 धावांची गरज
- लॉकी फर्ग्यूसन गोलंदाजीवर वोक्स 2 धावांवर बाद
- बटलर माघारी, 24 चेंडूत 39 धावांची गरज
- ख्रिस वोक्स मैदानात
- बटलरची खेळी 59 धावांवर संपुष्टात
- लॉकी फर्ग्यूसनने साऊथी करवी केले झेलबाद
- बटलर 60 चेंडूत 59 धावांवर बाद
- सामना रंगतदार स्थितीत; इंग्लंडला विजयासाठी 36 चेंडूत 53धावांची गरज
- स्टोक्स आणि बटलर यांच्या शभंर धावाची भागीदारी
- स्टोक्स अर्धशतक पूर्ण
- बटरलचे अर्धशतक पूर्ण
- इंग्लंडला विजयासाठी 42 चेंडूत 59 धावांची गरज
- सामना रंगतदार स्थितीत; इंग्लंडला विजयासाठी 48 चेंडूत 65 धावांची गरज
- स्टोक्स 46 धावा तर बटलर 44 धावा करत मैदानात
- स्टोक्स आणि बटलमध्ये 90 धावांची भागिदारी पूर्ण
- इंग्लंड दीडशे पार; विजयासाठी 60 चेंडूत 72 धावांची गरज
- इंग्लंड दीडशे पार; विजयासाठी 72 चेंडूत 86 धावांची गरज
- इंग्लंडला विजयासाठी 82 चेंडूत 94 धावांची गरज
- स्टोक्स 32 तर बटलर 30 धावांवर नाबाद
- इंग्लंड 36 षटकात 4 बाद 143 धावा
- स्टोक्स आणि बटलमध्ये 50 धावांची भागिदारी पूर्ण
- इंग्लंड 34 षटकात 4 बाद 173 धावा
- स्टोक्स आणि बटरची जोडी जमली
- इंग्लंड शंभरी पार
- जोस बटलर मैदानात
- इंग्लंड 23.1 षटकात 4 बाद 86 धावा
- इंग्लंडला चौथा धक्का, कर्णधार मॉर्गन 9 धावांवर माघारी, निशामच्या गोलंदाजीवर लॉकी फर्ग्यूसनने घेतला झेल
- बेन स्टोक्स मैदानात
- इंग्लंडला तिसरा धक्का; बेअरस्टो माघारी, लॉकी फर्ग्यूसनने बेअरस्टोला केले 36 धावांवर 'क्लीन बोल्ड'
- कर्णधार इयॉन मॉर्गन मैदानात
- इंग्लंडला दुसरा धक्का; जो रुट 7 धावांवर माघारी, रुटला डी ग्रँडहोमेने केले टॉम लॅथमकरवी झेलबाद
- इंग्लंड 16 षटकात 1 बाद 59 धावा
- बेअरस्टो 18 धावांवर तर जो रुट 2 धावांवर खेळत आहे
- इंग्लंड संघाचे 10 षटकात 1 गडी बाद 39 धावा
- इंग्लंड 7 षटकात 1 गडी बाद 33 धावा
- जो रूट मैदानात
- इंग्लंडला पहिला धक्का, मॅट हेन्रीने जेसन रॉयला लॅथमकरवी केले झेलबाद; रॉयने केल्या 20 चेंडूत 17 धावा
- इंग्लड संघाच्या 4 षटकात बिनबाद 16 धावा
- पहिल्याच चेंडूवर बोल्टने केले पायचितचे आपील
- इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो मैदानात
लॉर्ड्सवर रंगणाऱ्या या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने सावध फलंदाजीला सुरुवात केली. सलामीवीर मार्टिन गुप्टीलला वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने 19 धावांवर माघारी धाडत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या केन विल्यमसनने सलामीवीर हेन्री निकोलसला साथीला घेत संघाचे शतक धावफलकावर लावले. विल्यमसनने 30 तर, निकोलसने 4 चौकारांसह 55 धावांची उपयुक्त खेळी केली. विल्यमसन आणि निकोलस बाद झाल्यावर अनुभवी रॉस टेलरही स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर आलेल्या टॉम लॅथमने कॉलिन डी ग्रँडहोमेसह छोटी भागिदारी रचली. लॅथमने केलेल्या 47 धावांच्या खेळीमुळे न्यूझीलंडला सव्वादोनशेचा टप्पा गाठता आला.
इंग्लंडकडून चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळाले. ख्रिस वोक्स आणि लियाम प्लंकेटने प्रत्येकी 3 बळी घेतले. तर, जोफ्रा आर्चर आणि मार्क वूडला प्रत्येकी 1 बळी मिळाला.
दोन्ही संघांची Playing XI-
- इंग्लंड - ईऑन मॉर्गन (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, जॉस बटलर, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड.
- न्यूझीलंड - केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गुप्टील, रॉस टेलर, ट्रेंट बोल्ट, डी ग्रँडहोमे, लॉकी फर्ग्यूसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, जिमी निशाम, हेन्री निकोलस, मिशेल सँटेनर.