लंडन - विश्वकरंडक स्पर्धेत भारताच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे तब्बल तीन आठवड्यांसाठी भारतीय संघातून बाहेर पडला आहे. त्यामुळे धवनच्या जागी आता कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. खालील चार खेळाडूंना धवनच्या जागी खेळण्याची संधी मिळू शकते.
श्रेयस अय्यर
अय्यरने आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन केले होते. लोकेश राहुलला जर सलामीला पाठवले तर चौथ्या क्रमांकासाठी अय्यरचा विचार होऊ शकतो.
रिषभ पंत
या स्पर्धेसाठी रिषभ पंतची चर्चा मोठ्या प्रमाणावर चालू होती. पण त्याची संधी हुकली. आता धवनच्या दुखापतीमुळे त्याचे नाव परत वर आले आहे.
अंबाती रायडू
चांगले प्रदर्शन करुनही स्पर्धेसाठी निवड न झाल्यामुळे रायडू निराश झाला होता. मात्र आता संघात रायडूचा विचार होऊ शकतो.
अजिंक्य रहाणे
अजिंक्य सध्या काउंटी क्रिकेट खेळत आहे. सलामीचा फलंदाज म्हणून त्याचा विचार होऊ शकतो.
लंडनच्या द ओव्हल मैदानावर खेळण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने ३६ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात शिखर धवनने 109 चेंडूत 117 धावाची शानदार शतकी खेळी केली. या सामन्यादरम्यान शिखरच्या डाव्या आंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला आता विश्वकरंडक स्पर्धेला मुकावे लागणार आहे.