ETV Bharat / sports

पंचांच्या चुकीमुळे न्यूझीलंड विश्वकरंडकाला मुकला, माजी पंच सायमन टॉफेल यांनी केले स्पष्ट - former cricket umpire

चौकारांच्या निकषानुसार इंग्लंडला विश्वविजेते घोषित करण्यात आले. मात्र, ओव्हरथ्रोच्या नियमानुसार निकाल वेगळा लागणे होते शक्य!

माजी पंच सायमन टॉफेल यांच्यामुळे क्रिकेटविश्वात खळबळ!
author img

By

Published : Jul 16, 2019, 9:40 AM IST

लॉर्ड्स - विश्वकरंडकाच्या इतिहासामध्ये प्रथमच अंतिम सामना इंग्लंड विरुध्द न्यूझीलंड हा बरोबरीत सुटला. त्यानंतर सुपरओव्हरमध्येही हा सामना बरोबरीत सुटला. तेव्हा अखेर चौकारांच्या निकषानुसार इंग्लंडला विश्वविजेता घोषित करण्यात आले. या सामन्यात न्यूझीलंडला सुपर ओव्हरपूर्वी सामना जिंकण्याची संधी होती. मात्र, एका ओव्हरथ्रोने न्यूझीलंडच्या विजयावर पाणी फेरले. आयसीसीच्या ओव्हरथ्रोच्या नियमानुसार सहा नव्हे, तर पाचच धावा द्यायला हव्या होत्या, असे माजी पंच सायमन टॉफेल यांनी नियमानुसार दाखवून दिल्याने खळबळ उडाली आहे.

इंग्लंड संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात 15 धावांची गरज होती. याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर स्टोक्सने मिड विकेटला जोरदार फटका लगावला आणि राशिदला दोन धावांसाठी कॉल दिला. तेव्हा सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी तैनात असलेल्या गुप्टीलने काही क्षणात चेंडू उचलून स्टोक्सला बाद करण्यासाठी थ्रो केला. मात्र, हा थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागून थेट सीमारेषेपार गेला. तेव्हा पंचानी पळालेल्या दोन धावा आणि चौकार असे मिळून इंग्लंडला सहा धावा बहाल केल्या. पण आयसीसीच्या नियमानुसार पंचानी पाचच धावा देणे अपेक्षित होते.

या ठिकाणी सहाऐवजी पाच धावा दिल्या गेल्या असत्या तर सामन्याचा निकाल कदाचित वेगळा लागू शकला असता.

आयसीसीचा नियम काय सांगतो -

आयसीसीने निर्देशित केलेल्या १९.८ च्या नियमात ओव्हर थ्रोची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूमुळे चेंडू सीमापार गेला तर त्याचा फायदा दुसऱ्या संघाला होतो. परंतु फलंदाजाने थ्रो करण्याआधी धाव पूर्ण केली नसेल तर, एक अतिरिक्त धाव फलंदाजाला मिळत नाही. या नियमानुसार पाहिल्यास न्यूझीलंडच्या गुप्टीलने थ्रो केला तेव्हा बेन स्टोक्स क्रीझमध्ये नव्हता. त्यामुळे दोन धावांच्या ऐवजी केवळ एक धाव देणे गरजेचे होते. मात्र, पंचाच्या या चुकीमुळे न्यूझीलंडला विश्वकरंडकाला मुकावे लागले.

Intro:Body:

former cricket umpire simon taufel makes a statement on that six runs of wc final 2019

icc, cricket world cup, england vs new zealand, former cricket umpire,  simon taufel 

माजी पंच सायमन टॉफेल यांच्यामुळे क्रिकेटविश्वात खळबळ!

लॉर्ड्स - विश्वकरंडकाच्या इतिहासामध्ये प्रथमच अंतिम सामना इंग्लंड विरुध्द न्यूझीलंड हा बरोबरीत सुटला. त्यानंतर सुपरओव्हरमध्येही हा सामना बरोबरीत सुटला. तेव्हा अखेर चौकारांच्या निकषानुसार इंग्लंडला विश्वविजेते घोषीत करण्यात आले. या सामन्यात न्यूझीलंडला सुपर ओव्हरपूर्वी सामना जिंकण्याची संधी होती. मात्र, एका ओव्हरथ्रोने न्यूझीलंडच्या विजयावर पाणी फेरले.  पण त्या ओव्हरथ्रोच्या नियमानुसार सहा नव्हे, तर पाचच धावा द्यायला हव्या होत्या, असे माजी पंच सायमन टॉफेल यांनी नियमानुसार दाखवून दिल्याने खळबळ उडाली आहे.

इंग्लंड संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात 15 धावांची गरज होती.याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर स्टोक्सने मीड विकेटला जोरदार फटका लगावला आणि राशिदला दोन धावांसाठी कॉल दिला. तेव्हा सीमारेषेवर क्षेत्ररक्षणासाठी तैनात असलेल्या गुप्टीलने काही क्षणात चेंडू उचलून स्टोक्सला बाद करण्यासाठी थ्रो केला. मात्र, हा थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागून थेट सीमारेषेपार गेला. तेव्हा पंचानी पळालेल्या दोन धावा आणि चौकार असे मिळून इंग्लंडला सहा धावा बहाल केल्या. पण आयसीसीच्या नियमानुसार पंचानी पाचच धावा देणे अपेक्षित होते. 

जर या पाच धावा दिल्या गेल्या असत्या तर सामन्याचा निकाल कदाचिल वेगळा लागू शकला असता.

आयसीसीचा नियम काय सांगतो - 

आयसीसीने निर्देशित केलेल्या १९.८ च्या नियमात ओव्हर थ्रोची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूमुळे चेंडू सीमापार गेला तर त्याचा फायदा दुसऱ्या संघाला होतो. परंतु जर, फलंदाजाने थ्रो करण्याआधी धाव पूर्ण केली नसेल तर, एक अतिरिक्त धाव फलंदाजाला मिळत नाही. या नियमानुसार पाहिल्यास न्यूझीलंडच्या गुप्टीलने थ्रो केला तेव्हा बेन स्टोक्स क्रिझमध्ये नव्हता. त्यामुळे दोन धावांच्या ऐवजी केवळ एक धाव देणे गरजेचे होते. मात्र, पंचाच्या या चूकीमुळे न्यूझीलंडला विश्वकरंडकाला मुकावे लागले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.