मँचेस्टर - आयसीसी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत-न्यूझीलंडदरम्यानची उपांत्य लढत रंगतदार अवस्थेत असताना पावसाचे आगमन झाले. या वेळी भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करून न्यूझीलंडला 46.1 षटकांत 5 बाद 211 धावांत रोखले होते. मात्र, पावसाचा अडथळा आल्याने सामना थांबवला गेला. त्यामुळे सामना पाहायला आलेले चाहते कमालीचे नाराज झाले. मात्र, त्यापैकी एक कुटूंब सामना पाहायला मिळतोय म्हणून भलतेच खूष होते. कारण, हे कु़टूंब तब्बल २३ हजार किलोमीटरचा प्रवास करून सामना पाहायला मँचेस्टरमध्ये आले आहेत.
-
🛄 23,000 km
— ICC (@ICC) July 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🌍 18 countries
👪 3 generations of a family
🚗 1 EPIC road-trip!
Meet the family who's driven across the world to support #TeamIndia pic.twitter.com/t8miaSMAwO
">🛄 23,000 km
— ICC (@ICC) July 9, 2019
🌍 18 countries
👪 3 generations of a family
🚗 1 EPIC road-trip!
Meet the family who's driven across the world to support #TeamIndia pic.twitter.com/t8miaSMAwO🛄 23,000 km
— ICC (@ICC) July 9, 2019
🌍 18 countries
👪 3 generations of a family
🚗 1 EPIC road-trip!
Meet the family who's driven across the world to support #TeamIndia pic.twitter.com/t8miaSMAwO
आयसीसीने या कुटूंबाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर तूफान प्रसिद्धी मिळत आहे. या क्रिकेटवेड्या कुटूंबाने १८ देश आणि दोन खंडातून प्रवास केला आहे. सिंगापूरमधून त्यांचा हा प्रवास सुरू झाला होता.
आजच्या राखीव दिवशी काही वेळातच सामन्याला सुरुवात होईल. जर आजचा दिवसही पावसामुळे वाया गेला तर, भारत थेट अंतिम सामन्यात दाखल होईल.