ETV Bharat / sports

CRICKET WORLDCUP : आज रंगणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तान सामना

आजचा सामना दुपारी ३ वाजता सुरू होईल.

आज रंगणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तान सामना
author img

By

Published : Jun 12, 2019, 10:39 AM IST

टाँटन - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत टाँटनच्या कूपर कौंटी मैदानावर आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. मागच्या सामन्यात भारताविरुद्ध पराभव झालेल्या ऑस्ट्रेलियाचे आज पुनरागमनाचे लक्ष असेल. तर, दुसरीकडे पावसामुळे रद्द झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानचा संघही आज विजयी पताका फडकावण्यासाठी सज्ज असेल. आजचा सामना दुपारी ३ वाजता सुरू होईल.

ऑस्ट्रेलियाने विश्वकरंडकातील पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजला नमवले होते. मात्र भारताविरुद्ध महत्त्वाच्या क्षणी बळी गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. पाकिस्तानचा रेकॉर्ड सांगायचा झाला तर सलामीच्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध हार पत्करली होती. त्यानंतर मात्र यजमान इंग्लंडला १४ धावांनी मात देत पाकिस्तानने अनपेक्षित कामगिरी केली होती.

ऑस्ट्रेलियाचा संघ - अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, अ‍ॅलेक्स कॅरी, नथन कुल्टर-नाइल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल मार्श, डेव्हिड वार्नर आणि अ‍ॅडम झॅम्पा.

पाकिस्तानचा संघ - सर्फराज अहमद (कर्णधार), बाबर आजम, फखर जमान, इमाम उल हक, हॅरिस सोहेल, आसिफ अली, मोहम्मद हफीज, इमाद वसीम, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद हसनैन, शादाब खान, शोएब मलिक आणि वहाब रियाज.

Intro:Body:

Akshay Naikdhure

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.