गुरुग्राम - भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युझवेंद्र चहलने धनश्री वर्मा हिच्याशी लग्न केले. गुरुग्राममधील कर्मा लेक रिसॉर्टमध्ये युझवेंद्र आणि धनश्रीचा, विवाहसोहळा पारंपरिक हिंदू रिवाजाप्रमाणे पार पडला. सोशल मीडिया फोटो शेअर करत त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएईला रवाना होण्याआधी युझवेंद्र आणि धनश्री यांचा साखरपुडा सोहळा पार पडला.
-
22.12.20 💍
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) December 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
We started at “Once Upon A Time” and found “Our Happily Ever After,” coz’ finally, #DhanaSaidYuz for infinity & beyond! pic.twitter.com/h7k3G3QrYx
">22.12.20 💍
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) December 22, 2020
We started at “Once Upon A Time” and found “Our Happily Ever After,” coz’ finally, #DhanaSaidYuz for infinity & beyond! pic.twitter.com/h7k3G3QrYx22.12.20 💍
— Yuzvendra Chahal (@yuzi_chahal) December 22, 2020
We started at “Once Upon A Time” and found “Our Happily Ever After,” coz’ finally, #DhanaSaidYuz for infinity & beyond! pic.twitter.com/h7k3G3QrYx
लॉकडाउन काळात दोघांची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि युझवेंद्रने धनश्रीला लग्नासाठी मागणी घातली. दरम्यान, आयपीएलदरम्यान धनश्री चहलला पाठिंबा देण्यासाठी युएईत दाखल झाली होती. हॉटेलमध्ये, मैदानावर चहल आणि धनश्रीचे रोमँटीक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
कोण आहे धनश्री वर्मा
धनश्री वर्मा ही पेशाने डॉक्टर आहे. तिने २०१४ मध्ये मुंबईमधील डी. वाय. पाटील डेंटल कॉलेजमधून डॉक्टराचे शिक्षण घेतले आहे. यासोबत ती उत्कृष्ट कोरियोग्राफर तसेच यूट्यूबर देखील आहे.
सविस्तर थोड्याच वेळात...
हेही वाचा - IND Vs AUS : टीम इंडिया कसोटी मालिकेत वापसी करेल याची आशाच नाही, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचं मत
हेही वाचा - मुंबई पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईवर रैनाची प्रतिक्रिया आली समोर...