चेन्नई - भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी पाहुण्या संघाने, २२७ धावांनी जिंकत ४ कसोटी सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या पराभवासाह भारतीय संघाने आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील अव्वलस्थान गमावले आहे. तर दुसरीकडे भारतावर मोठा विजय मिळवत इंग्लंडने गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाला चेन्नई कसोटी सामन्यात दारूण पराभवाला समोरे जावे लागले. इंग्लंडने पहिली कसोटीत सहज विजय मिळवत दौऱ्याची सुरूवात धडाक्यात केली. पहिल्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे गुण आणि क्रमवारी जारी केली आहे. त्यानुसार इंग्लंडचा संघ अव्वल स्थानावर पोहोचला आहे. तर पहिल्या क्रमांकावर असणारा भारताचा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे. विजयाच्या टक्केवारी यादीत न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानी तर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानी आहे.
इंग्लंड संघाच्या नावावर ४४२ पॉईंट असून त्यांची विजयाची टक्केवारी ७०.२ इतकी आहे. ७० टक्केसह न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून त्यांच्या विजयाची टक्केवारी ६९. २ टक्के इतकी आहे. भारतीय संघाच्या विजयाची टक्केवारी ६८.३ इतकी आहे.
-
A huge win over India in the first Test has propelled England to the top of the ICC World Test Championship standings 👀#WTC21 pic.twitter.com/8AaC8XMrjr
— ICC (@ICC) February 9, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A huge win over India in the first Test has propelled England to the top of the ICC World Test Championship standings 👀#WTC21 pic.twitter.com/8AaC8XMrjr
— ICC (@ICC) February 9, 2021A huge win over India in the first Test has propelled England to the top of the ICC World Test Championship standings 👀#WTC21 pic.twitter.com/8AaC8XMrjr
— ICC (@ICC) February 9, 2021
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने आगामी दक्षिण आफ्रिकेचा दौरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष फायदा न्यूझीलंड संघाला झाला असून ते थेट जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचले आहे. पण न्यूझीलंडविरूद्ध अंतिम सामन्यात कोणता संघ खेळणार याबाबतचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या मालिकेतील निकालावर हा संघ ठरणार आहे. यात भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तिन्ही संघांना संधी आहे.
हेही वाचा - पहिली कसोटी पाहुण्यांची, इंग्लंडचा भारतावर 'मोठा' विजय
हेही वाचा - रिकी पाँटिंगच्या घरात चोरी, चोरांनी पळवली गाडी!