मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पुढे ढकलला आहे. आता हा सामना १८ ते २२ जून दरम्यान खेळला जाईल. या अंतिम सामन्यासाठी २३ जून हा राखीव दिन म्हणून ठेवण्यात आला आहे. पहिल्या जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १० ते १४ जून दरम्यान खेळला जाणार होता.

हेही वाचा - 'मास्टर-ब्लास्टर' सचिन तेंडुलकर पुन्हा ताडोबा दौऱ्यावर
सध्या भारतीय क्रिकेट संघ आयसीसी जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे. तर, न्यूझीलंड दुसर्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत एकूण नऊ संघ सहभागी आहेत. भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि बांगलादेश क्रिकेट संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.