ETV Bharat / sports

वेस्ट इंडिजकडून अफगाणिस्तानचा २३ धावांनी पराभव; पठाणांची 'गुणां'ची पाटी रिकामीच - west indies

अखेरचा विश्‍वकरंडक सामना खेळत असल्याने ख्रिस गेलच्या फलंदाजीची उत्सुकता होती. तो सहकाऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत मैदानात उतरला. मात्र, त्याला १८ चेंडूत एका षटकारासह केवळ सात धावा करता आल्या.

वेस्ट इंडिजकडून अफगाणिस्तानचा २३ धावांनी पराभव; पठाणांची 'गुणां'ची पाटी रिकामीच
author img

By

Published : Jul 4, 2019, 11:59 PM IST

लीड्स - विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शेवटच्या सामन्यातही अगाणिस्तानचा वेस्ट इंडिजने २३ धावांनी पराभव केला. यामुळे या विश्वकरंडक स्पर्धेत अफगाणिस्तानची पाटी रिकामीच राहिली. अफगाणिस्तानने ९ सामने खेळले असून या सर्व सामन्यात त्यांना पराभूत व्हावे लागले. अखेरचा विश्‍वकरंडक सामना खेळत असलेला ख्रिस गेल फलंदाजीत अपयशी ठरला.

वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३११ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने आक्रमक सुरूवात केली. सामन्यात एकवेळ अफगाणिस्तानचा संघ २ बाद १८९ धावा केल्या होत्या. नंतर मात्र, मधली फळी ढेपाळल्याने अफगाणिस्तान निर्धारित ५० षटकात सर्वबाद २८८ धावा करु शकला. अफगाणिस्तानकडून इकराम अलिखलने सर्वाधिक ८६ धावा केल्या. इकराम जोपर्यंत खेळपट्टीवर होता. तोपर्यंत सामना अफगाणिस्तानच्या बाजूने झुकला होता. तेव्हा ख्रिस गेलने इकरामला बाद केले. त्यानंतर त्याच षटकात झदरान धावचित झाला आणि सामन्याला कलाटणी मिळाली.

या सामन्यात अखेरचा विश्‍वकरंडक सामना खेळत असल्याने ख्रिस गेलच्या फलंदाजीची उत्सुकता होती. तो सहकाऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारत मैदानात उतरला. मात्र, त्याला १८ चेंडूत एका षटकारासह केवळ सात धावा करता आल्या. त्यानंतर विंडीजच्या एविन लुईस, शाय होप, निकोलस पूरन यांनी अर्धशतके झळकावली. तर हेटमायर व जेसन होल्डर यांनीही आक्रमक फलंदाजी करत अफगाणिस्तानला ३१२ धावांचे आव्हान दिले.

वेस्ट इंडिजविरुध्दच्या पराभवानंतर आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत अफगाणिस्तानची गुणाची पाटी रिकामीच राहिली आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला अफगाणिस्तानचा संघ स्पर्धेत अनपेक्षित कामगिरी करणार असे बोलले जात होते. मात्र ती अपेक्षा फोल ठरली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.