ETV Bharat / sports

क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर!...'या' तारखेला भारत खेळणार वर्ल्डकपचा पहिला सामना

भारतीय महिला संघ गट साखळीत सात सामने खेळेल. त्यातील तीन सामने पात्रता संघाविरुद्ध खेळणार आहे. पात्रता संघ जाहीर होणे अद्याप बाकी आहे. गट साखळीत भारतीय संघ यजमान न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडशी सामने खेळेल.

Women's WC 2022: India to begin campaign against Qualifier on March 6

author img

By

Published : Dec 15, 2020, 12:53 PM IST

दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) २०२२मध्ये न्यूझीलंड येथे होणाऱ्या महिला विश्वकरंडक स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर केले. ही स्पर्धा ४ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान खेळली जाईल. आयसीसीच्या संकेतस्थळाच्या अहवालानुसार, एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ आपला पहिला सामना ६ मार्च रोजी पात्र होणाऱ्या संघाविरूद्ध खेळणार आहे.

Women's WC 2022: India to begin campaign against Qualifier on March 6
आयसीसी

हेही वाचा - दिल्लीच्या मैदानात बसवण्यात येणार अरुण जेटलींचा पुतळा

भारतीय महिला संघ गट साखळीत सात सामने खेळेल. त्यातील तीन सामने पात्रता संघाविरुद्ध खेळणार आहे. पात्रता संघ जाहीर होणे अद्याप बाकी आहे. गट साखळीत भारतीय संघ यजमान न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडशी सामने खेळेल.

Women's WC 2022: India to begin campaign against Qualifier on March 6
महिला विश्वकरंडक स्पर्धा 2022 वेळापत्रक

भारतीय संघ १० मार्च रोजी यजमान न्यूझीलंड, १२ मार्च रोजी पात्रता संघ, १६ मार्च रोजी इंग्लंड, १९ मार्च रोजी ऑस्ट्रेलिया, २२ मार्च रोजी क्वालिफायर संघ आणि २७ मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल.

३१ सामने खेळवण्यात येणार -

''महिलांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये ४ मार्च ते ३ एप्रिल २०२२ दरम्यान ३१ सामने खेळवण्यात येणार आहेत. ऑस्ट्रेलियात महिलांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर खेळल्या जाणार्‍या पहिल्या जागतिक महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मूळ वेळापत्रक फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये स्थगित करण्यात आली होती. तीच सहा यजमान शहरे आणि ठिकाणे २०२२ साठी राखून ठेवली गेली आहेत'', असे आयसीसीने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.