ETV Bharat / sports

विराटने अनुष्का आणि बंगळुरू संघासोबत साजरा केला वाढदिवस; रोमँटिक अंदाजात दिसला कोहली - हॅपी बर्थ डे विराट न्यूज

अनुष्का शर्माने तिचा पती आणि क्रिकेटर विराट कोहलीचा वाढदिवस साजरा केला. बंगळुरूचे खेळाडू या पार्टीत सहभागी झाले होते. या पार्टीचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत.

With Anushka Sharma By His Side, Here's How Virat Kohli Celebrated His Birthday
विराटने अनुष्का आणि बंगळुरू संघासोबत साजरा केला वाढदिवस; रोमँटिक अंदाजात दिसला कोहली
author img

By

Published : Nov 5, 2020, 8:09 PM IST

दुबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आज आपला ३२वा वाढदिवस साजरा करत आहे. तो आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी युएईत आहे. यंदाचा बर्थ डे विराटसाठी खूपच खास आहे. कारण त्याची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गर्भवती आहे. तिने पतीचा बर्थ डे दणक्यात साजरा केला. या बर्थ डे पार्टीचा व्हिडिओ सद्या व्हायरल झाला आहे. यात विराट रोमँटिक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आयपीएलचा तेरावा हंगाम खेळण्यासाठी विराट, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसंघासोबत युएईत आहे. विराटसोबत अनुष्का शर्माही आहे. तिने विराटचा वाढदिवस साजरा केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे. अनुष्काच्या या सप्राईज पार्टीने विराटही रोमँटिक झाला आणि त्याने रोमँटिक अंदाजात पत्नीचे आभार मानले. या पार्टीला बंगळुरू संघातील खेळाडू आणि स्टाप उपस्थित होता.

दरम्यान, विराटच्या वाढदिवसाच्या पार्टीत बंगळुरूचा युजवेंद्र चहल तिची होणारी पत्नी धनश्री वर्मासोबत सहभागी झाला होता. पार्टीत त्याने अनुष्का विराट यांच्यासह फोटो काढले. हे फोटोदेखील सद्या चांगलेच व्हायरल झाले आहेत.

विराटची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी -

विराटने आपल्या आक्रमक फलंदाजीद्वारे जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने भारताकडून ८६ कसोटी, २४८ एकदिवसीय आणि ८२ टी-२० सामने खेळले आहेत. यात विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ११ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. तर कसोटीत 7 हजार २४० धावा जमवल्या आहेत. याशिवाय टी-२० क्रिकेटमध्ये त्यांच्या नावे २ हजार ७९४ धावा आहेत.

विश्वविजेत्या संघाचा विराट सदस्य -

२०११ सालच्या विश्वकरंडक आणि २०१३ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघात विराट होता. त्यानंतर २०१४ साली महेंद्रसिंह धोनीकडून त्याने कसोटी संघाचे नेतृत्व स्वीकारले तर जानेवारी २०१७ साली मर्यादीत षटकांच्या संघाचा देखील तो कर्णधार झाला.

हेही वाचा - Virat Kohli Birthday : विराट कोहलीचे 'हे' खास १० विक्रम वाचाच....

हेही वाचा - आयपीएल २०२० : हंगामात 'फेल' गेलेल्या खेळाडूंवर एक नजर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.