ETV Bharat / sports

तिरंगी मालिकेच्या सहाव्या सामन्यात बांगलादेशचा आयर्लंडवर ६ गडी राखून विजय

गोलंदाजीत बांगलादेशकडून अबू जायेदने घेतल्या ५ विकेट्स

author img

By

Published : May 15, 2019, 11:56 PM IST

बांगलादेशचा आयर्लंडवर ६ गडी राखून विजय

डबलिन - आयर्लंड, बांगलादेश आणि वेस्ट इंडिज याच्यांत सुरु असलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेतील सहाव्या सामन्यात बुधवारी बांगलादेश संघाने आयर्लंडवर ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात आयर्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशसमोर विजयासाठी २९३ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान बांगलादेशने ४३ व्या षटकामध्ये ४ गडी गमावत पूर्ण केले.

प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडकडून सलामीवीर पॉल स्टर्लिंग शानदार १३० धावांची शतकी खेळी साकारली तर कर्णधार विल्यम पोर्टरफील्डने ९४ धावा करत आयर्लंडला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. गोलंदाजीत बांगलादेशकडून अबू जायेदने सर्वाधिक ५ तर मोहम्मद सैफुद्दीनने २ आणि रूबेल हुसैन १ विकेट घेतली.

अबू जायेद
अबू जायेद

आयर्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने लिटन दासने सर्वाधिक ७६ धावा केल्या. तर तमीम इकबालने ५७, शाकिब अल हसनने ५० आणि महमुदुल्ला व मुशफिकूर रहीमने प्रत्येकी ३५ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. आयर्लंडच्या ५ फलंदाजांना माघारी पाठवणार्‍या अबू जायेदला सामनाविराचा पुरस्कार मिळाला. या तिरंगी मालिकेचा अंतिम सामना १७ मे ला बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळण्यात येणार आहे.

Intro:Body:

spo

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.