मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. याची माहिती त्याने खुद्द दिली.
डेव्हिड वॉर्नरला भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दुखापत झाली होती. त्यामुळे तो टी-२० आणि कसोटी मालिकेतील २ सामन्याला मुकला होता. त्यानंतर तो भारताविरुद्धच्या सिडनी आणि ब्रिस्बेन कसोटी सामन्यात देखील १०० टक्के फिट नव्हता. तरी देखील ऑस्ट्रेलियाने त्याला अंतिम संघात स्थान दिले होते.
वॉर्नरने मंगळवारी एक ट्विट केलं आहे. त्यात, मी काल रात्री समालोचन दरम्यान केलेल्या टिप्पणीबाबत स्पष्टीकरण देऊ इच्छितो की, माझ्या दुखापतीवर उपचार चालू राहिल. मला किमान सहा ते ९ महिन्यांपर्यंत याचा त्रास सहन करावे लागेल. मी चार मार्चला न्यूज साउथ वेल्सकडून वापसी करणार आहे, असे सांगितलं.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभय संघात ५ सामन्याची टी-२० मालिका खेळली जात असून ख्राईस्टचर्च येथील पहिला सामना जिंकत न्यूझीलंडने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या दौऱ्यासाठी वॉर्नरची निवड ऑस्ट्रेलिया संघात करण्यात आलेली नाही.
हेही वाचा - Vijay Hazare Trophy २०२१ : बिहारच्या खेळाडूला कोरोनाची लागण
हेही वाचा - श्रीलंकेचा फलंदाज उपुल थरंगाची क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा