ETV Bharat / sports

ENG vs WI : लाल टोपीमागचे रहस्य काय?

दरम्यान या सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू हे लाल टोपी आणि लाल रंगाची छटा असलेली जर्सी घालून मैदानात उतरले आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्रू स्ट्रॉसची पत्नी रुथच्या स्मरणार्थ दोन्ही संघांनी हा निर्णय घेतला आहे.

why england and windies players wear red caps in third test
ENG vs WI : लाल टोपीमागचे रहस्य काय?
author img

By

Published : Jul 24, 2020, 4:34 PM IST

मॅँचेस्टर - कोरोनानंतर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी मालिकेचा अखेरचा सामना आज ओल्ड ट्रॅफर्टवर सुरू झाला आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज विरूद्धच्या या मालिकेत दोन्ही संघांनी 1-1अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे या तिसऱ्या कसोटीत कोण वर्चस्व राखणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान या सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू हे लाल टोपी आणि लाल रंगाची छटा असलेली जर्सी घालून मैदानात उतरले आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्रू स्ट्रॉसची पत्नी रुथच्या स्मरणार्थ दोन्ही संघांनी हा निर्णय घेतला आहे.

  • The Third Test of the #raisethebat Test Series will be named The Ruth Strauss Foundation Test with the first day seeing cricket turn red again for this year’s #RedForRuth Day.

    — England and Wales Cricket Board (@ECB_cricket) July 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

29 डिसेंबर 2018 रोजी वयाच्या 46 व्या वर्षी अँड्रूची पत्नी रुथने कर्करोगाच्या उपचारांदरम्यान अखेरचा श्वास घेतला. पत्नीच्या निधनानंतर स्ट्रॉसने तिच्या नावाने कर्करोग झालेल्यांसाठी निधी उभारण्यासाठी एका संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या निधीसाठी दोन्ही संघातील खेळाडू या सामन्यात लाल टोपी घालून मैदानात उतरले आहेत.

या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.