ETV Bharat / sports

पहिल्या पराभवाचा बदला; वेस्ट इंडीजचा भारतावर ८ गडी राखून विजय

सलामीवीर लेंडल सिमन्सने नाबाद ६७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला एव्हिन लुईसने ४० धावा काढत चांगली साथ दिली. सलामी जोडीने झुंझार खेळी केल्याने वेस्ट इंडीजचा विजय सूकर झाला.

author img

By

Published : Dec 8, 2019, 11:20 PM IST

India vs West Indies
वेस्ट इंडीजचा भारतावर ८ गडी राखून विजय

तिरुवनंतपुरम - येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम रंगलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडीजने भारतावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह 'हम भी कुछ कम नही' असा इशारा भारताला देत मालिकेतील पहिल्या पराभवाचा बदला वेस्ट इंडीजने घेतला. धडाकेबाज अर्धशतकी खेळी करणारा सिमन्स सामनावीर ठरला.

लेंडल सिमन्सने नाबाद ६७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला एव्हिन लुईसने ४० धावा काढत चांगली साथ दिली. सलामी जोडीने झुंझार खेळी केल्याने वेस्ट इंडीजचा विजय सूकर झाला. यष्टीरक्षक निकोलस पूरनने नाबाद ३८ धावांची खेळी केली. भारताकडून रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

हेही वाचा - India vs West Indies, २nd T२०: रोहितला मागे टाकत विराटची विश्वविक्रमाला गवसणी

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून शिवम दुबे (५४) आणि ऋषभ पंत (नाबाद ३३) या दोघांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही. सलामी जोडी स्वस्तात परतल्यानंतर दुबेने एक बाजू लावून धरत अर्धशतकी खेळी केली. विराट कोहलीही (१९) लवकर माघारी परतल्यानंतर यष्टीरक्षक ऋषभ पंतने २२ चेंडूत ३३ धावा करत वेस्ट इंडीजसमोर आव्हानात्मक लक्ष्य उभारण्यात योगदान दिले. मात्र, त्याच्यानंतर इतर फलंदाज झटपट बाद झाल्याने १७१ धावांचे आव्हान इंडीजसमोर ठेवले.

वेस्ट इंडीजने या विजयामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरीत साधली आहे. मालिकेतील अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

Intro:बातमी आधीच पाठवली आहे,आता सोबत व्हिडीओ फाईल जोडली आहे Body:बातमी आधीच पाठवली आहे,आता सोबत व्हिडीओ फाईल जोडली आहे Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.