विशाखापट्टणम - वेस्ट इंडीजने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील सलामीच्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का दिला. भारतीय संघ आज दुसऱ्या सामन्यात या पराभवाची परतफेड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. भारतीय संघासाठी हा सामना 'करो वा मरो' असा आहे. पण विंडीजला हा सामना जिंकून १७ वर्षांचा भारताविरुद्धच्या मालिका विजयाचा दुष्काळ संपुष्टात आणायचा आहे.
केरॉन पोलार्डच्या नेतृत्वात वेस्ट इंडीज संघाला मालिका विजयाची संधी आहे. विंडीजला मागील १७ वर्षात एकदाही भारतात एकदिवसीय मालिका जिंकता आलेली नाही. यापूर्वी विंडीजने भारताविरुद्ध २००२-०३ मध्ये सात सामन्यांची मालिका ४-३ ने जिंकली होती.
दुसऱ्या सामन्यात विंडीजचा संघ भारतावर वरचढ ठरला तर भारतीय संघाच्या नावे खराब विक्रमाची नोंद होईल. १५ वर्षात भारतीय संघावर मायदेशातील सलग दोन एकदिवसीय मालिकेत पराभूत होण्याची नामुष्की ओढावेल. भारतीय संघाने मार्चमध्ये मायदेशात खेळताना ऑस्ट्रेलिया विरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-२ ने गमावली आहे.
हेही वाचा - मराठमोळ्या स्मृतीचा सन्मान, आयसीसीच्या एकदिवसीय अन् टी-२० संघात मिळालं स्थान
हेही वाचा - भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, 'हा' खेळाडू भारतीय संघाला धोकादायक ठरणार ?
हेही वाचा - इंग्लंडच्या यशस्वी फिरकीपटूने केली क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर