ETV Bharat / sports

विंडीजचा 'साहेबांना' दणका, पहिल्या कसोटीत मिळवला 4 गडी राखून विजय

पाचव्या दिवशी इंग्लंडने विंडीजसमोर 200 धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजकडून ब्लॅकवूडने 95 धावांची आश्वासक खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला. त्याने या खेळीत 12 चौकार लगावले.

author img

By

Published : Jul 12, 2020, 10:49 PM IST

Updated : Jul 12, 2020, 11:00 PM IST

west indies beat england by 4 wickets in first test match
विंडीजचा साहेबांना दणका, पहिल्या कसोटीत मिळवला 4 गडी राखून विजय

साउथम्प्टन - कोरोनानंतर सुरू झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजने यजमान इंग्लंडवर चार गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत विंडीजने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 5 बळी घेणाऱ्या विंडीजच्या शेनन गॅब्रियलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

पाचव्या दिवशी इंग्लंडने विंडीजसमोर 200 धावांचे आव्हान ठेवले. इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची सुरूवात खराब झाली. त्यांच्या उपहारापर्यंत 3 बाद 35 धावा होत्या. त्यानंतर चेस आणि ब्लॅकवुडने किल्ला लढवला. ब्लॅकवूडने 95 धावांची आश्वासक खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला. त्याने या खेळीत 12 चौकार लगावले. त्याला चेसने 37 धावा करत चांगली साथ दिली. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जोफ्रा आर्चरने 3 बेन स्टोक्सने 2 आणि मार्क वुडने 1 बळी घेतला.

कोरोनामुळे मार्चच्या मध्यापासून क्रिकेट बंद होते. तब्बल तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघातील कसोटी मालिकेतून क्रिकेट परतले आहे. दरम्यान, कोरोनाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने काही बदल केले आहेत, त्यानुसार ही मालिका रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय खेळवली जात आहे.

संक्षिप्त धावफलक -

नाणेफेक - इंग्लंड (फलंदाजी)

इंग्लंड पहिला डाव - सर्वबाद 204

वेस्ट इंडिज पहिला डाव - सर्वबाद 318

इंग्लंड दुसरा डाव - सर्वबाद 313

वेस्ट इंडिज दुसरा डाव - 200/6 (वेस्ट इंडिज विजयी)

Last Updated : Jul 12, 2020, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.