केपटाउन - दक्षिण आफ्रिकेत सध्या मॅझन्सी सुपर टी-२० लीग स्पर्धेचा थरार रंगला आहे. या लीगमध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाजने केप टाऊन ब्लित्झ संघाकडून खेळताना एक अप्रतिम यॉर्कर टाकला. त्याने टाकलेल्या चेंडूचा अंदाज येण्यापूर्वीच प्रतिस्पर्धी फलंदाजांचे स्टम्प्स उडाले होते.
-
Is this the prettiest no ball ever?#MSLT20 pic.twitter.com/FPb78Kcqq9
— Mzansi Super League 🔥 🇿🇦 🏏 (@MSL_T20) December 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Is this the prettiest no ball ever?#MSLT20 pic.twitter.com/FPb78Kcqq9
— Mzansi Super League 🔥 🇿🇦 🏏 (@MSL_T20) December 1, 2019Is this the prettiest no ball ever?#MSLT20 pic.twitter.com/FPb78Kcqq9
— Mzansi Super League 🔥 🇿🇦 🏏 (@MSL_T20) December 1, 2019
केप टाऊन ब्लित्झ आणि टीश्वाने स्पार्टन्स यांच्यात लीगचा २२ वा सामना झाला. या सामन्यात वहाब रियाजने रोएल्फ वॅन डर मर्वे याला एक अप्रतिम यॉर्कर टाकला. मर्वेला काही कळण्यापूर्वीच चेंडूने स्टम्प्स उडवले. पण, वहाबचा हा चेंडू नो बॉल ठरला आणि मर्वेला जीवदान मिळाले. जर हा चेंडू नो बॉल ठरला नसता तर लीगमध्ये 'बेस्ट बॉल' ठरला असता, असे क्रिकेट जाणकारांचे म्हणणे आहे. पण, या सामन्यात मर्वेच्या स्पार्टन्स संघाला पराभव पत्करावा लागला. केप टाऊन ब्लित्झ संघाने हा सामना १५ धावांनी जिंकला.
प्रथम फलंदाजी करताना केप टाऊन ब्लित्झने ५ बाद १५७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल स्पार्टन्सला ७ बाद १४२ धावांपर्यंतच मजल मारता आली. एबी डिव्हिलियर्सने ३१ धावा करताना संघासाठी संघर्ष केला, परंतु त्याचे विजयात रुपांतर करण्यात तो चुकला. डेल स्टेनने १० धावात सर्वाधिक ३ गडी बाद केले.
हेही वाचा - कसोटी अजिंक्यपद स्पर्धा : गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाची मुसंडी, भारत 'या' स्थानावर
हेही वाचा - विश्वविजेत्या इंग्लंडला नव्हे तर, न्यूझीलंडला मिळाला 'हा' महत्वाचा पुरस्कार