पुणे - भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने एकदिवसीय क्रिकेटमधील पदार्पणाचा सामन्यात २६ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. तो पदार्पणाच्या सामन्यात सर्वात जलद अर्धशतक करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. या सामन्यात कृणाल भावनिक झालेला पाहायला मिळाला. त्याला रडताना पाहून हार्दिकही डग आऊटमध्ये बसून रडत होता.
हार्दिक व कृणाल यांचे वडील हिमांशू पांड्या यांना १६ जानेवारीला हृदयविकाराचा झटका आला. यात त्याचे निधन झाले. त्यावेळी कृणाल सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत खेळत होता. ही बातमी कळताच त्याने स्पर्धा मध्यातच सोडून घरी परतला होता.
-
Century stand ✅
— BCCI (@BCCI) March 23, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Half centuries for @klrahul11 & @krunalpandya24 ✅
300+ on the board ✅
Brilliant batting display from #TeamIndia as they post 317/5 in 50 overs. @Paytm #INDvENG pic.twitter.com/9iU3lmZQBz
">Century stand ✅
— BCCI (@BCCI) March 23, 2021
Half centuries for @klrahul11 & @krunalpandya24 ✅
300+ on the board ✅
Brilliant batting display from #TeamIndia as they post 317/5 in 50 overs. @Paytm #INDvENG pic.twitter.com/9iU3lmZQBzCentury stand ✅
— BCCI (@BCCI) March 23, 2021
Half centuries for @klrahul11 & @krunalpandya24 ✅
300+ on the board ✅
Brilliant batting display from #TeamIndia as they post 317/5 in 50 overs. @Paytm #INDvENG pic.twitter.com/9iU3lmZQBz
कृणालला आज भारताच्या एकदिवसीय संघात खेळण्याची संधी मिळाली. हार्दिकच्या हातून त्याला पदार्पणाची कॅप देण्यात आली. तेव्हा कृणाल भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर त्याने सातव्या क्रमाकांवर फलंदाजीला येत ३१ चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी साकारली. यात ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर देखील कृणाल भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. भारताचा डाव संपला तेव्हा कृणाल आणि हार्दिक गळाभेट घेताना भावनिक झाले होते.
-
This is all heart 💙🫂
— BCCI (@BCCI) March 23, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A teary moment for ODI debutant @krunalpandya24 post his brilliant quick-fire half-century💥💥@hardikpandya7 #TeamIndia #INDvENG @Paytm pic.twitter.com/w3x8pj18CD
">This is all heart 💙🫂
— BCCI (@BCCI) March 23, 2021
A teary moment for ODI debutant @krunalpandya24 post his brilliant quick-fire half-century💥💥@hardikpandya7 #TeamIndia #INDvENG @Paytm pic.twitter.com/w3x8pj18CDThis is all heart 💙🫂
— BCCI (@BCCI) March 23, 2021
A teary moment for ODI debutant @krunalpandya24 post his brilliant quick-fire half-century💥💥@hardikpandya7 #TeamIndia #INDvENG @Paytm pic.twitter.com/w3x8pj18CD
एक अर्धशतक आणि अनेक विक्रम...
कृणाल पदार्पणाच्या सामन्यात सर्वात कमी चेंडूत अर्धशतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम इंग्लंडच्या जॉन मॉरिस याच्या नाव होता. त्याने १९९० मध्ये पदार्पण करताना अॅडलेड मैदानावर ३५ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्याचा विक्रम कृणालने मोडीत काढला. इतकेच नव्हे तर कृणाल पदार्पणाच्या सामन्यात सातव्या क्रमाकांवर फलंदाजीला येत अर्धशतक ठोकणारा तिसरा भारतीय ठरला आहे. तसेच कृणाल एकदिवसीय क्रिकेटमधील पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक स्ट्राइट रेटने धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात कृणालने १८७. १० स्ट्राइक रेटने धावा केल्या.
हेही वाचा - IND vs ENG: पदार्पणात वादळी खेळी, कृणालच्या नावे अनेक विक्रमांची नोंद
हेही वाचा - शिखर धवन 'इतक्या' वेळा ठरला 'नर्व्हस नाईंटीज'चा शिकार