मुंबई - भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी जर फिट असेल तर तो टीम इंडियासाठी हिट आहे, असे दिग्गज क्रिकेटपटू वसीम जाफरने नुकतेच म्हटले होते. आता जाफरने धोनीबाबत अजून एक खुलासा केला आहे. क्रिकेटमधून धोनीला ३० लाख कमवायचे होते आणि रांचीमध्ये आरामात जगायचे होते, असे जाफर म्हणाला.
सोशल माडियावर झालेल्या लाईव्ह चॅटमध्ये जाफरने हा खुलासा केला. सुरूवातीचे एक-दोन वर्ष तो माझ्यासोबत राहिला होता. पण आता त्याने ठरवलेल्या ध्येयापेक्षा अधिक मिळवले आहे, असेही जाफर म्हणाला.
धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडकानंतर क्रिकेटपासून लांब आहे. तो आयपीएल २०२० क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. पण, कोरोना विषाणूच्या फैलावामुळे आयपीएलवर अनिश्चिततेचे सावट आहे. यामुळे धोनीचे क्रिकेटमध्ये पुनरागमन लांबणीवर पडले आहे.