कराची - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने त्याच्या ट्विटर हँडलवर गोलंदाजीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये वसीम अक्रम श्रीलंकेचा फलंदाज रोशन महानामाला गोलंदाजी करत आहे. 1989-90 च्या या क्रिकेट सामन्यात अक्रमने टाकलेले सलग दोन चेंडू महानामाच्या लागू नये अशा ठिकाणी जाऊन लागले होते.
या दोन चेंडूनंतर महानामाला मैदान सोडावे लागले. हा व्हिडीओ पोस्ट करत अक्रमने महानामाची माफी मागितली आहे. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत राहतात, असेही त्याने कॅप्शनमध्ये लिहिले.
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज आणि क्रिकेट समालोचक डीन जोन्स यांनीही अक्रमचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. वसीम अक्रमच्या या व्हिडिओवर भाष्य करताना डीन जोन्स यांनी लिहिले, "तो बॅटने खेळण्याऐवजी दुसर्या कशाने तरी तुला सामारे जात आहे."