सिडनी - भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पुनरागमन करणार आहे. याची माहिती ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार टिम पेन याने दिली. वॉर्नरला नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. यामुळे तो सुरूवातीचे दोन कसोटी सामने खेळू शकला नव्हता.
पेनने बुधवारी माध्यमाशी बोलताना सांगितले की, 'ही बाब जाहीर आहे की, वॉर्नर तिसरी कसोटी खेळणार आहे. वॉर्नर एक दर्जेदार खेळाडू आहे. तो संघातील इतर खेळाडूंसाठी ऊर्जेचा स्त्रोत ठरतो. तो आत्मविश्वास वाढण्याचा प्रयत्न करतो. तो कोणत्याही संघाविरोधात आपला नैसर्गिक खेळ करत विरोधी संघावर दबाब निर्माण करू शकतो.'
आमच्या संघासाठी वॉर्नर दर्जेदार सदस्य आहे. कारण, तो जेव्हा धावा करतो. त्यावेळी आमच्या मधल्या फळीवर दडपण येत नाही. तसेच विरोधी संघातील गोलंदाज जेव्हा थकतात. तेव्हा मार्नस लाबूशेन, स्टिव्ह स्मिथ यांच्यासाठी ही बाब फायदेशीर ठरते. वॉर्नर आमच्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडतो, असे देखील पेनने सांगितले.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील अॅडलेडमधील पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलिया संघाने ८ गडी राखून जिंकला. यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटी सामना जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. उभय संघातील तिसऱ्या सामन्याला उद्यापासून (गुरूवार ता. ७) सिडनीमध्ये सुरूवात होणार आहे.
हेही वाचा - कसोटी संघाची जर्सी परिधान करणे अभिमानास्पद, पुढील आव्हानासाठी तयार; नटराजनचे ट्विट
हेही वाचा - NZ vs PAK: न्यूझीलंडकडून पाकिस्तानचा डावाने पराभव; मालिकेत २-० ने निर्भेळ यश