ETV Bharat / sports

Ind vs Eng ३rd Test : राहुल गांधींचा जुना व्हिडिओ शेअर करत सेहवागने उडवली इंग्लंड संघाची खिल्ली - भारत वि. इंग्लंड तिसरा कसोटी सामना न्यूज

भारताच्या फिरकी माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. अक्षर पटेल आणि आर. अश्विन या जोडीने ९ गडी बाद केले. यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ शेअर करत इंग्लंड फलंदाजीची खिल्ली उडवली.

virender sehwag trolled england team sharing rahul gandhi old video
Ind vs Eng 3rd Test : राहुल गांधींचा जुना व्हिडिओ शेअर करत सेहवागने उडवली इंग्लंड संघाची खिल्ली
author img

By

Published : Feb 24, 2021, 8:10 PM IST

मुंबई - भारताविरूद्ध आपला पहिला डे-नाइट कसोटी सामना खेळणाऱ्या इंग्लंड संघाचा पहिला डाव अवघ्या ११२ धावांवर आटोपला. भारताच्या फिरकी माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. अक्षर पटेल आणि आर. अश्विन या जोडीने ९ गडी बाद केले. यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत इंग्लंड फलंदाजीची खिल्ली उडवली.

विरेंद्र सेहवाग हा हटक्या ट्विटसाठी प्रसिद्ध आहे. त्याने भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा डाव अवघ्या ११२ धावांत आटोपल्यानंतर एक ट्विट केलं आहे. यात त्याने, राहुल गांधी यांचा जुना व्हिडिओ शेअर करत इंग्लंड संघाची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान, कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. सलामीवीर जॅक क्रॉली वगळता इतर एकही फलंदाज भारतीय माऱ्याचा सामना करू शकला नाही. क्रॉलीने शानदार अर्धशतक केले. कर्णधार जो रूट (१७) स्वस्तात बाद झाला. जॅक क्रॉली अर्धशतक (५३) ठोकून माघारी परतला. पाठोपाठ बेन स्टोक्स (६), ओली पोप (१), जोफ्रा आर्चर (११), जॅक लीच (३) आणि स्टुअर्ट ब्रॉड (३) सारेच स्वस्तात बाद झाले.

हेही वाचा - Ind vs Eng : अक्षर पटेलने रचला इतिहास; 'या' दिग्गजांच्या पंगतीत मिळवलं स्थान

हेही वाचा - Ind vs Eng ३rd Test : भारताच्या फिरकीसमोर इंग्लंडची शरणागती, 'गल्ली बॉय' अक्षरचे ६ बळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.