ETV Bharat / sports

विरेंद्र सेहवागने भाजपचे तिकीट नाकारले; जाणून घ्या 'कारण'

भाजपने सेहवागला पश्चिम दिल्ली मतदारसंघातून उभा राहण्याची ऑफर दिली होती. परंतु, सेहवागने वैयक्तीक कारणांसाठी भाजपकडून लढण्यास नकार दिला आहे.

सेहवाग
author img

By

Published : Mar 15, 2019, 12:11 PM IST

नवी दिल्ली - भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने पश्चिम दिल्ली मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढण्यास नकार दिला आहे. भाजपने सेहवागला पश्चिम दिल्ली मतदारसंघातून उभा राहण्याची ऑफर दिली होती. परंतु, सेहवागने वैयक्तीक कारणांसाठी भाजपकडून लढण्यास नकार दिला आहे.

पश्चिम दिल्लीतून सध्या भाजप खासदार असलेले परवेश वर्मा यांनी सांगितले, पश्चिम दिल्ली मतदारसंघासाठी विरेंद्र सेहवागच्या नावाचा विचार चालू होता. परंतु, सेहवागने काही वैयक्तीक कारणांसाठी पश्चिम दिल्ली मतदारसंघातून लढण्यास नकार दिला आहे. सेहवागने त्याला राजकारण आणि निवडणुका लढवण्यात रस नसल्याचे सांगितले आहे.

याआधी सेहवाग हा हरियाणातील रोहतक मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो, अशी फेब्रुवारी महिन्यात चर्चा सुरू होती. परंतु, सेहवागने ट्वीटरवर पोस्ट करत या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड आणि दिल्ली भाजप प्रमुख मनोज तिवारी यांनी संपर्क फॉर समर्थन या अभियानाअंतर्गत सेहवागची भेट घेतली होती. यानंतर, सेहवाग भाजपमध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या.

Intro:Body:

Virender Sehwag denies to protest BJP ticket from west delhi

Virender Sehwag, denies, protest, BJP, ticket, west delhi, वीरेंदर सेहवाग, निवडणूक, भाजप, तिकिट, लोकसभा, नवी दिल्ली

विरेंद्र सेहवागने भाजपचे तिकीट नाकारले; जाणून घ्या 'कारण'

नवी दिल्ली - भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने पश्चिम दिल्ली मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लढण्यास नकार दिला आहे. भाजपने सेहवागला पश्चिम दिल्ली मतदारसंघातून उभा राहण्याची ऑफर दिली होती. परंतु, सेहवागने वैयक्तीक कारणांसाठी भाजपकडून लढण्यास नकार दिला आहे.

पश्चिम दिल्लीतून सध्या भाजप खासदार असलेले परवेश वर्मा यांनी सांगितले, पश्चिम दिल्ली मतदारसंघासाठी विरेंद्र सेहवागच्या नावाचा विचार चालू होता. परंतु, सेहवागने काही वैयक्तीक कारणांसाठी पश्चिम दिल्ली मतदारसंघातून लढण्यास नकार दिला आहे. सेहवागने त्याला राजकारण आणि निवडणुका लढवण्यात रस नसल्याचे सांगितले आहे.

याआधी सेहवाग हा हरियाणातील रोहतक मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो, अशी फेब्रुवारी महिन्यात चर्चा सुरू होती. परंतु, सेहवागने ट्वीटरवर पोस्ट करत या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यात केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड आणि दिल्ली भाजप प्रमुख मनोज तिवारी यांनी संपर्क फॉर समर्थन या अभियानाअंतर्गत सेहवागची भेट घेतली होती. यानंतर, सेहवाग भाजपमध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.