हैदराबाद - वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ६ गडी आणि ८ चेंडू राखून दिमाखदार विजय नोंदवला. धावांचा पाठलाग करण्यात तरबेज असलेल्या विराटने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. या खेळीसोबतच विराटने आपलाच साथीदार रोहित शर्माला एका विक्रमात पछाडले आहे.
हेही वाचा - INDvsWI 1st t20 : ३ गडी बाद करताच चहल करणार मोठा विक्रम
विराटने या सामन्यात नाबाद ९४ धावांची खेळी केली. विराटचे हे आंतरराष्ट्रीय टी-२० मधील २३ वे अर्धशतक होते. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. याआधी विराट आणि रोहित शर्मा २२ अर्धशतकांसह एकाच स्थानी होते. मात्र, आता विराट सरस झाला आहे.
या विक्रमातील खेळाडू-
२३- विराट कोहली, सामने- ७३
२२- रोहित शर्मा, सामने- १०२
१७- मार्टिन गप्टील, सामने- ८३
१६ - पॉल स्टर्लिंग, सामने - ७२
१६ - डेव्हिड वॉर्नर, सामने - ७६