ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीने फलंदाजांना दिली तंबी - रांची

विश्वकरंडक स्पर्धेआधी फलंदाजांनी फॉर्मात येणे गरजेचे आहे. अन्यथा जे खेळाडू संघाबाहेर आहेत त्यांना संघात येण्याची संधी दिली जाईल.

कोहली
author img

By

Published : Mar 9, 2019, 2:38 PM IST

रांची - तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ३२ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या ३१४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव २८१ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने केलेले शतक वाया गेले. त्याने ९५ चेंडूत १२३ धावांची खेळी केली होती.

विराट म्हणाला, आम्हाला ३५० धावांचे आव्हान मिळेल, असे वाटत होते. ऑस्ट्रेलियाने पहिल्या ४० षटकात चांगली फलंदाजी केली. परंतु, शेवटच्या १० षटकात आम्ही चांगली गोलंदाजी केली. मॅक्सवेल धावबाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांविरुद्ध गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. ३१४ धावांचे आव्हान पहिल्या ३ विकेट लवकर पडल्यानंतरही आम्ही पार करु शकत होतो. आम्हांला ७ वाजल्यानंतर खेळपट्टीवर दव पडतील असे सांगण्यात आले होते. परंतु, तसे काही झाले नाही. खेळपट्टीवर नंतर फलंदाजी करणे अवघड होत गेले. तुम्ही विकेट हातात शिल्लक असताना शेवटच्या वेळी १२-१३ षटकात १०० धावा करू शकता. परंतु, ५ विकेट गेल्यानंतर हे कठीण होवून बसते.

विश्वकरंडक स्पर्धेआधी फलंदाजांनी फॉर्मात येणे गरजेचे आहे. अन्यथा जे खेळाडू संघाबाहेर आहेत त्यांना संघात येण्याची संधी दिली जाईल. आम्हाला फलंदाजी करताना भागीदारी करणे आवश्यक आहे. पुढील सामन्यांसाठी आम्ही संघात काही बदल करणार आहोत. संघात काही नवीन चेहऱयांना संधी दिली जाईल. त्यांना चांगली कामगिरी करुन विश्वकरंडकासाठी जागा मिळवण्यासाठी चांगली संधी राहणार आहे.

Intro:Body:

Virat kohli statement after third ODI against Australia

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर विराट कोहलीने फलंदाजांनी दिली तंबी

रांची - तिसऱया एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ३२ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या ३१४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव २८१ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने केलेले शतक वाया गेले. त्याने ९५ चेंडूत १२३ धावांची खेळी केली होती. 

विराट म्हणाला, आम्हाला ३५० धावांचे आव्हान मिळेल, असे वाटत होते. ऑस्ट्रेलियाने पहिल्या ४० षटकात चांगली फलंदाजी केली. परंतु, शेवटच्या १० षटकात आम्ही चांगली गोलंदाजी केली. मॅक्सवेल धावबाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांविरुद्ध गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. ३१४ धावांचे आव्हान पहिल्या ३ विकेट लवकर पडल्यानंतरही आम्ही पार करु शकत होतो. आम्हांला ७ वाजल्यानंतर खेळपट्टीवर दव पडतील असे सांगण्यात आले होते. परंतु, तसे काही झाले नाही. खेळपट्टीवर नंतर फलंदाजी करणे अवघड होत गेले. तुम्ही विकेट हातात शिल्लक असताना शेवटच्या वेळी १२-१३ षटकात १०० धावा करू शकता. परंतु, ५ विकेट गेल्यानंतर हे कठीण होवून बसते. 

विश्वकरंडक स्पर्धेआधी फलंदाजांनी फॉर्मात येणे गरजेचे आहे. अन्यथा जे खेळाडू संघाबाहेर आहेत त्यांना संघात येण्याची संधी दिली जाईल. आम्हाला फलंदाजी करताना भागीदारी करणे आवश्यक आहे. पुढील सामन्यांसाठी आम्ही संघात काही बदल करणार आहोत. संघात काही नवीन चेहऱयांना संधी दिली जाईल. त्यांना चांगली कामगिरी करुन विश्वकरंडकासाठी जागा मिळवण्यासाठी चांगली संधी राहणार आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.