मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली स्वत:ला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यात कसलीही कसर सोडत नाही. लॉकडाऊनमध्येही विराट व्यायामाकडे लक्ष देत आहे. विराटने मंगळवारी सोशल मीडियावर स्वत:चा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो '180 डिग्री लँडिंग' करताना दिसून येतो.
व्हिडीओमध्ये विराट एक 180 डिग्री उडी मारत दुसऱ्या बाजूला उतरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ''माझा पहिला लँडिंग 180 शॉट, टॉप एक्झरसाइज'', असे त्याने व्हिडीओला कॅप्शन दिले आहे.
-
My first shot at 180 landings. Top exercise 👌 pic.twitter.com/HmtR05OlNW
— Virat Kohli (@imVkohli) May 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">My first shot at 180 landings. Top exercise 👌 pic.twitter.com/HmtR05OlNW
— Virat Kohli (@imVkohli) May 26, 2020My first shot at 180 landings. Top exercise 👌 pic.twitter.com/HmtR05OlNW
— Virat Kohli (@imVkohli) May 26, 2020
जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला विराट त्याच्या फिटनेसाठी खूप जागरूक आहे. तो सतत व्यायाम करतो आणि जिममध्ये बराच वेळ घालवतो. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरदेशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या व्हायरसमुळे क्रिकेटविश्वालाही धक्का बसला आहे. सध्या सर्व क्रिकेट मालिका व स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आयपीएलसारख्या नामांकित लीगही पुढे ढकलण्यात आली आहेत.