ETV Bharat / sports

सिर्फ 'धोनी' नाम ही काफी है! महेंद्रसिंहंच माझा शेवटपर्यंत कर्णधार राहील - कोहली - virat kohli

मी ज्यावेळी भारतीय संघाच्या प्रथम ड्रेसिंग रुममध्ये गेलो होते. त्यावेळी माझा कर्णधार महेंद्रसिंह धोनी होता. तेव्हापासून माझ्या मनात धोनीच माझा कर्णधार होता आणि तोच कायम राहणार, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिली आहे.

सिर्फ 'धोनी' नाम ही काफी है..! धोनीच माझा शेवटपर्यंत कर्णधार राहिल - कोहली
author img

By

Published : Jul 6, 2019, 8:24 PM IST

लीड्स - मी ज्यावेळी भारतीय संघाच्या प्रथम ड्रेसिंग रुममध्ये गेलो होते. त्यावेळी माझा कर्णधार महेंद्रसिंह धोनी होता. तेव्हापासून माझ्या मनात धोनीच माझा कर्णधार होता आणि तोच कायम राहणार, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिली आहे. आयसीसीने धोनीच्या जन्मदिवसाच्या एकदिवस आधी त्यांच्या कार्यकिर्दीवर एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यामध्ये विराटने आपले मत व्यक्त केले आहे. कोहलीने या व्हिडिओच्या माध्यमातून धोनीवर स्तुतीसमने उधळली.

कोहली म्हणाला की, मी पहिल्यांदा ज्यावेळी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये गेले होतो. त्यावेळी माझा कर्णधार महेंद्रसिंह धोनी होता. आज भलेही भारतीय संघाचा कर्णधार असेन मात्र, माझ्यासाठी धोनीच माझा कर्णधार आहे आणि तो कायम राहणार आहे, असे त्याने सांगितलं.

महेंद्रसिंह धोनी हा महान खेळाडू आहे. त्याच्याकडे संघ दबावात असताना योग्य निर्णय घेण्याची क्षमता आहे. तसेच प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःला शांत ठेवण्याची विलक्षण कसब धोनीकडे आहे. धोनीकडून खूप काही शिकण्यासारखे असल्याचे कोहली म्हणाला.

आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये महेंद्रसिंह धोनीने संथ खेळी केल्याने त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. काहींनी तर धोनीने निवृत्ती स्वीकारावी, असा सल्लाही दिला. यावर मात्र, कोहलीने धोनीच्या खेळीचे समर्थन केले. त्याने माझा धोनीवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत माझ्या संघात धोनीला पाहणे, हे माझ्यासाठी आनंददायी असल्याचे सांगितले.

धोनीला माझ्यावरविश्वास होता, त्यामुळे त्याने मला संघात जागा दिली. आम्ही एक होऊन संघासाठी योगदान देत आहोत. मैदानात असू की मैदानाबाहेर आम्ही दोघे एका दुसऱ्याला समजून घेतो. धोनीच्या संघात असल्याने संघाच्या खेळाडूमध्ये वेगळी ऊर्जा निर्माण होते. असेही कोहली म्हणाला.

दरम्यान, आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेनंतर महेंद्रसिंह धोनी निवृत्त होणार असल्याची चर्चा रंगल्या आहेत.

Intro:Body:

cricket

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.