नवी दिल्ली - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या वेस्ट इंडीज विरुध्दच्या टी-२० मालिकेत व्यस्त आहे. विंडीज विरुद्धच्या ३ सामन्याच्या मालिकेत दोन सामने झाले असून पहिला सामना भारताने तर दुसरा वेस्ट इंडीजने जिंकला आहे. अखेरचा तिसरा निर्णायक सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर उद्या (बुधवारी) रंगणार आहे. दरम्यान, या सामन्याआधी एका मुलाखतीत विराटने आपली आवडती अभिनेत्रीविषयी सांगितलं.
तिरुअनंतपुरमच्या सामन्यानंतर विराटने एका क्रीडावाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत विराटला तुझी आवडती अभिनेत्री कोण असा प्रश्न विचारण्यात आला. महत्वाचे म्हणजे, यात अनुष्का शर्माला सोडून दुसरी अभिनेत्रीविषयी हा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा विराट समोर श्रध्दा कपूर, दीपिका पादुकोन, कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट हे चार पर्याय ठेवण्यात आले.
तेव्हा विराटने मजेशीर उत्तर दिले. त्याने सांगितलं की, 'अनुष्का शर्मा हीच माझी आवडती अभिनेत्री आहे, तीच अखेरपर्यंत राहिल.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पण लहानपणी मला किरण खेर यांची अॅक्टिंग खूप आवडत होती, असेही विराटने स्पष्ट केलं. तर अभिनेतामध्ये आमिर खान आवडत असल्याचेही तो म्हणाला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, या मुलाखतीत विराटने आपल्या लहानपणाचे अनेक किस्से सांगितले. लहानपणी विराट 'कल हो ना हो' हे गाणे आपल्याला खूप आवडत होते. आता मात्र माझ्या आवडीचे गीत हे 'किन्ना सोणा' असल्याचे तो म्हणाला.