ETV Bharat / sports

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत विराट-रोहितचा जलवा कायम - rohit sharma in odi news

एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत विराट अग्रस्थानी विराजमान असून रोहित शर्मा दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर, एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह दुसर्‍या क्रमांकावर आहे. विराटच्या खात्यात ८७१ तर, रोहितच्या खात्यात ८५५ गुण जमा आहेत. पाकिस्तानचा बाबर आझम ८२९ गुणांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे. साऊथम्प्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात शतक झळकावलेला अँड्र्यू बाल्बर्नी ४२ तर, पॉल स्टर्लिंग २६ व्या स्थानावर आहे.

virat kohli retain top spot in icc odi ranking
आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत विराट-रोहितचा जलवा कायम
author img

By

Published : Aug 7, 2020, 8:01 AM IST

दुबई - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसीच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रमवारीत आपला 'जलवा' कायम राखला आहे. तर, आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बाल्बर्नी आणि पॉल स्टर्लिंग यांनी फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी उडी मारली आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत विराट अग्रस्थानी विराजमान असून रोहित शर्मा दुसर्‍या क्रमांकावर आहे. तर, एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह दुसर्‍या क्रमांकावर आहे. विराटच्या खात्यात ८७१ तर, रोहितच्या खात्यात ८५५ गुण जमा आहेत. पाकिस्तानचा बाबर आझम ८२९ गुणांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे. साऊथम्प्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात शतक झळकावलेला अँड्र्यू बाल्बर्नी ४२ तर, पॉल स्टर्लिंग २६ व्या स्थानावर आहे.

त्याचबरोबर, गोलंदाजांच्या यादीत बुमराहने ७१९ गुणांसह दुसर्‍या स्थानावर कब्जा केला असून, न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट प्रथम स्थानावर आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी ३०१ गुणांसह प्रथम स्थानावर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.