मुंबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शानदार प्रदर्शन करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याच्या या कामगिरीमुळेच त्याची गणना जगातील सर्वोत्कृष्ठ खेळाडूमध्ये केली जाते. तो फॉर्मात असला की, गोलंदाजांची काही खैर नसते. अशा विराटला एका गोलंदाजाने चांगलेच सतावले आहे. खुद्द विराटने ही माहिती दिली आहे.
विराटने भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीबरोबर लाईव्ह चॅट दरम्यान सांगितलं की, आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्नसमोर खेळणे खूप कठीण जात होते.
विराट २००९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळत होता. तर वॉर्न राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार होता. हा काळ विराटचा सुरूवातीचा काळ होता. या हंगामात वॉर्नने विराटला चांगलेच सतावले. याबाबत विराट म्हणाला, 'आयपीएल २००९ च्या हंगामात मला वॉर्नसमोर खेळणं कठीण जात होते. वॉर्नसमोर मी मूर्ख ठरलो होतो.'
मी २०११ मध्ये त्याच्याविरुद्ध सामना खेळलो. तेव्हा तिथे काही खास झाले नाही. या सामन्यानंतर, गोलंदाजाच्या पाठीमागे कधीच काही बोलू नको, असा सल्ला वॉर्नने मला दिला. पण मी त्याच्या सल्ल्यावर हसलो होतो आणि त्याचे म्हणणे ऐकले नाही, असेही विराटने सांगितले.
दरम्यान, विराट सद्या लॉकडाऊनमुळे घरीच आहे. तो विविध विषयावरुन व्हिडिओ पोस्ट करून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. नुकताच विराटचा एक व्हिडिओ तिची बॉलिवूड अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्माने शेअर केला आहे. यात विराट डायनॉसोरची अॅक्टिंग करताना पाहायला मिळाला.
हेही वाचा - 'या' अटीवर विराट करणार बायोपिकमध्ये मुख्य भूमिका
हेही वाचा - पत्नीसाठी काय पण..! विराट अनुष्कासाठी बनला डायनॉसोर, पाहा मजेशीर व्हिडिओ