मुंबई - जगभरातील अनेक क्रिकेटपटूंचे आपले आवडीचे शॉट्स आहेत. यात कोणी कव्हर ड्राइव्ह तर कोणी पुल शॉट अप्रतिम लगावतो. याशिवाय कोणी ऑन ड्राइव्ह आणि रिव्हर्स स्विप मारण्यात तरबेज आहे. यादरम्यान, आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन, सद्या क्रिकेट जगतातील खेळाडूंमध्ये कोणता खेळाडू कव्हर ड्राइव्ह चांगला मारतो, असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना विचारला. तेव्हा नेटीझन्सनीं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नावाला पसंती दिली आहे.
आयसीसीने या प्रश्नासाठी चार खेळाडूंची निवड केली होती. यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार जो रूटचा समावेश होता. यात पाकिस्तानच्या बाबर आझम, विराट कोहलीला मागे टाकत विजेता बनला.
आयसीसीच्या या प्रश्नावर २६०.१४३ लोकांनी मतदान केले. यात पाकिस्तानचा बाबर आझमला ४६ टक्के मते मिळाली. तर विराट कोहलीला ४५.९ टक्के मते मिळाली. बाबर आझम आणि विराट याच्यातील फरक फक्त ०.१ टक्के इतकाच होता. न्यूझीलंडच्या केन विल्यमसनला ७.१ टक्के तर इंग्लंडच्या रुटला फक्त १.१ टक्के वोट मिळाले.
हेही वाचा - IND VS ENG : अभिनंदन..!, बीसीसीआयने दिल्या रुटला शुभेच्छा
हेही वाचा - आपले क्षेत्र सोडून बाकी विषयावर बोलताना सचिनने काळजी घ्यावी, शरद पवारांचा सल्ला