ETV Bharat / sports

वॉर्नरच्या मुलीला विराटचे 'खास' गिफ्ट - डेव्हिड वॉर्नर लेटेस्ट न्यूज

वॉर्नरने आपली मुलगी इंडीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत इंडीने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची कसोटी संघाची जर्सी परिधान केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराटने वॉर्नरच्या मुलीला आपली जर्सी भेट म्हणून दिली. या भेटीबाबत वॉर्नरनेही त्याचे आभार मानले आहेत.

Warner's daughter Indi Rae
Warner's daughter Indi Rae
author img

By

Published : Jan 30, 2021, 4:58 PM IST

Updated : Jan 30, 2021, 5:05 PM IST

सिडनी - ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असतो. आपल्या नवनवीन आणि अतरंगी व्हिडिओमुळे वॉर्नर नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. त्याच्या व्हिडिओमुळे त्याचे भारतप्रेमही अनेकदा दिसून येते. वॉर्नरचे प्रोफाइल त्याच्या मुली आणि पत्नी कॅन्डिसच्या फोटोंनी भरले आहे. आता तो त्याच्या नव्या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा - भारत वि. इंग्लंड : तिसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडच्या संघात येणार स्फोटक फलंदाज

वॉर्नरने आपली मुलगी इंडीचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत इंडीने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची कसोटी संघाची जर्सी परिधान केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराटने वॉर्नरच्या मुलीला आपली जर्सी भेट म्हणून दिली. या भेटीबाबत वॉर्नरनेही त्याचे आभार मानले आहेत.

Warner's daughter Indi Rae
वॉर्नरची पोस्ट

या फोटोसोबत वॉर्नरने एक खास कॅप्शनही दिले. ''मला माहित आहे की आम्ही मालिका गमावली. परंतु इथे एक अतिशय आनंदी मुलगी आहे. विराट तू दिलेल्या जर्सीबद्दल आभार. इंडीला ही भेट खूप आवडली. ती डॅडी आणि अ‍ॅरॉन फिंचसमवेत विराट कोहलीची 'फॅन'आहे'', असे वॉर्नरने या कॅप्शनमध्ये लिहिले.

विशेष म्हणजे मैदानाबाहेर फिंच आणि वॉर्नर खूप चांगले मित्र आहेत. त्यासोबत वॉर्नर आणि विराटही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. विराटने ऑस्ट्रेलियामध्ये एकदिवसीय आणि टी -२० मालिका खेळल्या. त्यानंतर आपल्या मुलीच्या जन्मासाठी तो पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतला.

Last Updated : Jan 30, 2021, 5:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.