ETV Bharat / sports

गर्भवती हत्तीणीच्या क्रूर हत्येमुळे विराट कोहली दु:खी, म्हणाला... - ऋषभ पंत हत्तीणीच्या हत्येविषयी

केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीला अननसामध्ये चक्क स्फोटके टाकून खाण्यास देण्यात आली होती. हा अननस खाताच या गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला. या घटनेचा देशभरात निषेध होत आहे. या घटनेवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे.

Virat Kohli condemn Kerala elephant killing
गर्भवती हत्तीणीच्या क्रूर हत्येमुळे विराट कोहली दु:खी, म्हणाला...
author img

By

Published : Jun 4, 2020, 6:51 AM IST

मुंबई - केरळमध्ये काही लोकांनी एका गर्भवती हत्तीणीची क्रूरपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली. यानंतर सोशल मीडियावर प्राणीप्रेमींसह नेटीझन्समधून संताप व्यक्त होत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीदेखील या घटनेने दु:खी झाला आहे. त्याने ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.

  • Appalled to hear about what happened in Kerala. Let's treat our animals with love and bring an end to these cowardly acts. pic.twitter.com/3oIVZASpag

    — Virat Kohli (@imVkohli) June 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भूकेल्या गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर विराट म्हणाला की, 'केरळमध्ये हत्तीणीबाबत जे काही घडले त्याबद्दल मला दु:ख झाले आहे. प्राण्यांबद्दल लोकांमध्ये ममत्व, प्रेम असायला हवे, असे धक्कादायक प्रकार थांबायला हवेत.'

दरम्यान, विराटसोबत यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने देखील या घटनेचा निषेध केला आहे. त्याने केरळमध्ये गर्भवती हत्तीणीची जी क्रूरपणे हत्या केली आहे, ती धक्कादायक आहे. एवढे निर्दयी कोण कसे असू शकतं. या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा द्यायला हवी, असे म्हटलं आहे.

  • Heartbroken, speechless, angry & shocked to read the news about the pregnant elephant in Kerala. How can anyone be so cruel. Hope the guilty are punished severely. pic.twitter.com/YKFCrrKPwZ

    — Rishabh Pant (@RishabhPant17) June 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे प्रकरण -

अन्नाच्या शोधात ही गर्भवती भुकेलेली हत्तीण जंगलातून बाहेर आली. ती अन्नाच्या शोधात खेड्यात फिरत होती. तेव्हा मलप्पुरम येथे काही निर्दयी लोकांनी गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिले. हत्तीणीच्या तोंडात फटाके फुटले आणि हत्तीणीच्या गर्भाशयात वाढणार्‍या पिलासह तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. तेव्हा लोक चांगलेच संतापले आहेत.

हेही वाचा - इंग्लंडला मिळणार नवा कसोटी कर्णधार

हेही वाचा - वर्णभेदी वागणुकीबद्दल भारतीय क्रिकेटपटूंचा गौप्यस्फोट!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.