ETV Bharat / sports

मुलीच्या आगमनानंतर विराटने बदलला ट्विटर हँडलचा 'बायो' - विराट कोहली बेबी गर्ल

अनुष्का आणि विराट आपल्या मुलीची गोपनीयता आणि सुरक्षेबाबत खूप काटेकोर नियमांचे पालन करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, या जोडप्याने रुग्णालयातही काही निर्बंध लादले आहेत. लगतच्या खोल्या असलेल्या अभ्यागतांनाही विरुष्काच्या मुलीकडे 'एन्ट्री' मिळत नसल्याचे समोर आले आहे. मुलीच्या जन्मानंतर विराटने आपल्या ट्विटर हँडलचा बायो बदलला आहे. ''अभिमानी नवरा आणि बाप'', असे विराटने आपल्या ट्विटर हँडलच्या बायोमध्ये लिहिले आहे.

Virat Kohli changes Twitter bio after welcoming his newborn baby girl
मुलीच्या आगमनानंतर विराटने बदलला ट्विटर हँडलचा 'बायो'
author img

By

Published : Jan 18, 2021, 3:25 PM IST

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी ११ जानेवारीला त्यांच्या घरी छोट्या पाहुणीचे स्वागत केले. आपल्या मुलीच्या जन्मानंतर विराटने आपल्या ट्विटर हँडलचा बायो बदलला आहे. ''अभिमानी नवरा आणि बाप'', असे विराटने आपल्या ट्विटर हँडलच्या बायोमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा - मैदान मै मौत डाल दिया मियाँ!...गाबात सिराज चमकला

अनुष्का आणि विराट आपल्या मुलीची गोपनीयता आणि सुरक्षतेबाबत खूप काटेकोर नियमांचे पालन करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, या जोडप्याने रुग्णालयातही काही निर्बंध लादले आहेत. लगतच्या खोल्या असलेल्या अभ्यागतांनाही विरुष्काच्या मुलीकडे 'एन्ट्री' मिळत नसल्याचे समोर आले आहे.

Virat Kohli changes Twitter bio after welcoming his newborn baby girl
विराटने बदलला ट्विटर हँडलचा 'बायो'

विरुष्काने माध्यमांतील व्यक्तींना गिफ्ट हॅम्पर्सही पाठवले होते. ''तुम्ही आम्हाला नेहमी पाठिबा, प्रेम दिले आहे. आज आम्ही आमच्या आनंदात तुमचा समावेश करीत आहोत. आम्हाला मुलगी झाली आहे. या विशेष प्रसंगी आपणास एक विनंती आहे. आपल्याला आमच्या दोघांकडून आपल्याला पाहिजे असलेली माहिती मिळत राहील. परंतु आपणास विनंती आहे की, आमच्या मुलीचा फोटो काढू नका आणि त्यामध्ये कोणतीही माहिती जोडू नका. आम्हाला विश्वास आहे की, आपण आमची विनंती समजून घेऊ शकता. बरेच प्रेम आणि कृतज्ञता, अनुष्का आणि विराट.''

दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचे सांगितले होते. विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.