गुवाहाटी - भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेला ५ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी गुवाहाटी येथे रंगणार असून पहिल्या सामन्यात कोण बाजी मारतं याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हेही वाचा - टेटे : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठणारा मानव ठरला पहिला भारतीय खेळाडू
या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माच्या गैरहजेरीचा विराटला फायदा होणार आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सध्या विराट आणि रोहित सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत. विराटने ७५ सामन्यांत २६३३ धावा केल्या आहेत तर रोहितने १०४ सामन्यात २६३३ धावा केल्या आहेत. त्यामुळे या मालिकेत विराट एक धाव काढताच रोहितला मागे टाकणार आहे.
गुवाहाटी येथे होणाऱ्या लंकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यासाठी २७,००० तिकिटे आधीच विकली गेली आहेत.
टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर.
टी-२० मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ -
लसिथ मलिंगा (कर्णधार), दनुष्का गुणातिलाका, अविष्का फर्नांडो, अँजलो मँथ्यूज, दसुन शनाका, कुसल परेरा, निरोशन डिकवेला, धनंजय डि सिल्वा, इसुरु उडाना, भनुका राजपक्षे, ओशाडा फर्नांडो, वनिंदु हसरंगा, लहीरू कुमारा, कुसल मेंडिस, लक्षन संदाकन आणि कसुन रजीता.