नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि दिग्गज खेळाडू विराट कोहलीचा आज ३१ वा वाढदिवस आहे. विराटने आत्तापर्यंत अनेक विक्रम सर केले. बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत विराट खेळत नसला तरी त्याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.
हेही वाचा - हॉकीत भारताचा 'डबल' धमाका, दोन्ही संघ ठरले ऑलिम्पिकसाठी पात्र
एका मीडियासंस्थेच्या वृत्तानुसार, विराट हा डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक 'सर्च' केलेल्या खेळाडूंमध्ये अव्वल ठरला आहे. या विक्रमात सलग दुसऱ्या वर्षी विराटला पहिल्या तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यात यश आले. सर्वाधिक सर्च केलेल्या खेळाडूंमध्ये विराटने प्रथम, महेंद्रसिंह धोनीने दुसरे तर रोहित शर्माने तिसरे स्थान राखले आहे.
यंदाच्या वर्षी जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंत विराटला हा एका महिन्यात तब्बल २० लाख सर्च केले गेले आहे. तर, धोनी आणि रोहित एका महिन्यात 10 लाख वेळा सर्च झाले आहेत. क्रिकेट संघांचे सांगायचे झाले तर, टीम इंडियाला सर्वाधिक वेळा सर्च केले गेले आहे. तर, २०१८ मध्ये इंग्लंडच्या संघाला सर्वाधिक वेळा सर्च केले गेले होते.