दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीकडून (आयसीसी) सोमवारी ताजी जागतिक वनडे क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीत फलंदाजांमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली तर गोलंदाजांमध्ये भारताच्याच जसप्रीत बुमराहने आपले पहिले स्थान कायम राखले आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीत विराटसोबत भारतीय उपकर्णधार रोहित शर्मा ८३९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. टॉप टेनमध्ये रोहित आणि विराट वगळता एकाही भारतीय फलंदाजाला स्थान मिळवता आले नाहीय.
गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या १० गोलंदाजांमध्ये ३ भारतीयांचा समावेश आहे. यात जसप्रीत बुमराह पहिल्या, कुलदीप यादव सातव्या तर यजुवेंद्र चहल आठव्या स्थानी विराजमान आहेत. वनडेत अष्टपैलू खेळाडूंच्या यादित अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशीद खान ३५६ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
फलंदाजांची जागतिक क्रमवारी
- १) विराट कोहली - ८९० गुण
- २) रोहित शर्मा - ८३९ गुण
- ३) रॉस टेलर - ८३० गुण
गोलंदाजांची जागतिक क्रमवारी
- १) जसप्रीत बुमराह - ७७४ गुण
- २) ट्रेंट बोल्ट - ७५९ गुण
- ३) राशीद खान - ७४७ गुण